नवीन लेखन...

आमचे खेळ

या मित्रांनो सारे या, 
सर्व मिळूनी खेळू या   ।।धृ।।

खेळ आमच्या देशाचे
गरिबांसाठी सोईचे
 ।
मैदान नको मोठे ते
वस्तूही अल्प लागते
  ।।
 खेळांना त्या    समजून घ्या 
  या मित्रांनो सारे या,

हुतुतूचा खेळ बघा
दोन गट, छोटी जागा
  ।
स्पर्श रेषा ओलांडूनी
ह्तुतू म्हणती तोंडानी
  ।।
एकाच दमात   भिडू मारू या – 
या मित्रांनो सारे या,

खो खो मध्ये चपळाई
चकमा देण्याची घाई
  ।
उलट सुलट बसे
एकाच रांगेत दिसे
  ।। 
मिळता खो    भिडूला पकडू या 
या मित्रांनो सारे या,

लपंडाव हा खेळ कसा
लपलेल्यांना शोधत बसा
  ।
राज्य येते त्यावरती
शोध घेई सभोवती
  ।।
तीक्ष्ण नजर    ती ठेऊया –
—   या मित्रांनो सारे या,

आट्या पाट्या च्या खेळात
कांही घरे आखतात
  । 
सीमेवरती दक्ष राहती
घरात येण्या ते रोकती
  ।।
चपळाईने    घरात शिरू या –
या मित्रांनो सारे या,

एका पायाची गम्मत
लंगडी आहे माहित?
  ।
उड्या  मारीत पळावे
भिडू सारे पकडावे
  ।।
आखल्या रेषेतच    खेळू या –
या मित्रांनो सारे या,

एक दिलाने खेळू या
आनंद सारा लुटू या
  ।
निरोगी सदा राही तो
प्रफुल्ल मन बाळगतो
  ।।
शीण अभ्यासाचा    घालवू या –
मित्रांनो सारे या,

— डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..