नवीन लेखन...

कोणार्क सूर्य मंदिर

कोणार्क सूर्य मंदिर बघताना खूप वेगळेपण जाणवत होत , मुख्य करून आज 2021 मध्ये आम्ही किती वैचारिकदृष्ट्या मागासलेले आहोत हेच जाणवते. त्या सूर्यमंदिरावर काय नाही कोरून ठेवले ह्याचाच विचार करावा लागतो अगदी बालपणापासून वृध्दावस्थेपर्यंत सर्वकाही. आमची नजर आणि विचारशक्ती तोकडी आहे हे जाणवते. ज्यांच्या संस्कृतीप्रिय आणि भावना दुखावल्या जातात अशा लोकांनी ते पाहिले तर काय होईल, म्हणा पहाताच असतील ते . जर असा कोणी विकृत राजकारणी निघाला तर तो ते नष्ट करण्यास मागे पुढे पहाणार नाही अर्थात ती वेळ आता येऊन ठेपली आहे हे सागावेसे वाटते. कारण त्यात स्त्री पुरुष संबंध इतक्या उघडपणे दखवले आहेत की ह्यांच्या कचकड्याच्या भावना दुखवणारच यात शंका नाही.
आमचे पूर्वज खरोखर पुरोगामी होते आणि त्यांना पूर्णपणे समाजाचे ज्ञान होते यावरून सिद्ध होते. आज ‘ न्यूड ‘ चित्रांचे प्रदसर्शन जरी भरवले तर यांच्या भिकार भावनांना तडा जाईल. कालचीच बातमी बघीतले ती एक सिरीयल संबंधी म्हणे ती बंद करा. खरच अशा भिकार लोकांची किंवा करावीशी वाटते अरे उघड्या डोळ्याने जगाकडे बघा , आपल्या इतिहासाकडे बघा ‘ प्रेम ‘ म्हणजे नुसते संबंध नसतात , तर त्या प्रेमातही वेगळे प्रेमं असते. खरेच कोणार्क काय , खजुराहो काय आज ना उद्या हे भिकार लोक नष्ट करण्याच्या मागे लागतील ते धर्माच्या नावावर आणि कचकड्याच्या भावनेच्या जोरावर अशा या ‘ पंड्याना ‘ आताच आवरले पाहिजे. आणि हो कोणार्क आणि खजुराहो पाहूनच घ्या हे इतिहासाचे मारेकरी काहीही करतील ?
— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..