कोणार्क सूर्य मंदिर बघताना खूप वेगळेपण जाणवत होत , मुख्य करून आज 2021 मध्ये आम्ही किती वैचारिकदृष्ट्या मागासलेले आहोत हेच जाणवते. त्या सूर्यमंदिरावर काय नाही कोरून ठेवले ह्याचाच विचार करावा लागतो अगदी बालपणापासून वृध्दावस्थेपर्यंत सर्वकाही. आमची नजर आणि विचारशक्ती तोकडी आहे हे जाणवते. ज्यांच्या संस्कृतीप्रिय आणि भावना दुखावल्या जातात अशा लोकांनी ते पाहिले तर काय होईल, म्हणा पहाताच असतील ते . जर असा कोणी विकृत राजकारणी निघाला तर तो ते नष्ट करण्यास मागे पुढे पहाणार नाही अर्थात ती वेळ आता येऊन ठेपली आहे हे सागावेसे वाटते. कारण त्यात स्त्री पुरुष संबंध इतक्या उघडपणे दखवले आहेत की ह्यांच्या कचकड्याच्या भावना दुखवणारच यात शंका नाही.
आमचे पूर्वज खरोखर पुरोगामी होते आणि त्यांना पूर्णपणे समाजाचे ज्ञान होते यावरून सिद्ध होते. आज ‘ न्यूड ‘ चित्रांचे प्रदसर्शन जरी भरवले तर यांच्या भिकार भावनांना तडा जाईल. कालचीच बातमी बघीतले ती एक सिरीयल संबंधी म्हणे ती बंद करा. खरच अशा भिकार लोकांची किंवा करावीशी वाटते अरे उघड्या डोळ्याने जगाकडे बघा , आपल्या इतिहासाकडे बघा ‘ प्रेम ‘ म्हणजे नुसते संबंध नसतात , तर त्या प्रेमातही वेगळे प्रेमं असते. खरेच कोणार्क काय , खजुराहो काय आज ना उद्या हे भिकार लोक नष्ट करण्याच्या मागे लागतील ते धर्माच्या नावावर आणि कचकड्याच्या भावनेच्या जोरावर अशा या ‘ पंड्याना ‘ आताच आवरले पाहिजे. आणि हो कोणार्क आणि खजुराहो पाहूनच घ्या हे इतिहासाचे मारेकरी काहीही करतील ?
— सतीश चाफेकर.
Leave a Reply