नवीन लेखन...

मर्ढेकरांची कविता – बन बांबूचे पिवळ्या गाते

बन बांबूचे पिवळ्या गाते
आकाशातील अघोरेखिते
चराचरातील दळते संज्ञा
जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
लिंब कोरतो सांबरशिंगी
जुनी भाकीते नपुसकलिंगी
ज्या वाऱ्यातून त्यात उमटली
नवी पाउले, पण मेलेली

शतशतकांच्या पायलन्स वरती
किती कावळे टिंबे देती
उभा जागृती क्रियापदांचा
खडा पहारा, पण रोबोंचा
अढळ धृवाचा ढळला तारा
सप्तर्षींचा चुकला प्रश्न
गारठल्यावीण गळती गारा
अन् रेडिओवर राधेकृष्ण

बा.सी. मर्ढेकर
मर्ढेकरांची ह्या कवितेला दुसर्‍या महायुध्दाची पार्श्वभूमी आहे. ह्या कवितेत सम्राट, सेनापती, शास्त्रज्ञ आहेत. फसलेले कट आहेत. आणखी बरेच काही आहे. ह्या कवितेतील पिवळ्या बांबूचे बन कसले आहे ? ते कोठे आहे? ते का गात आहे? आणी हे अवकाशातील अधोरेखित काय आसावे ? कवितेतील ह्या ओळींवरून आपला असा समज होतो की ही कविता निसर्गवर्णनपर आहे. परंतु जरी आपल्याला असे वाटले तरी ही कवितेचा अर्थ जर त्या काळातील (दुसर्‍या महायुध्दाच्या) संदर्भांवरून लावायचा झाला, तर तो खूपच वेगळा आहे.

संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा

http://belsare.blogspot.com

— चंद्रशेखर बेलसरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..