देह चिंब-चिंब ओला, पाऊस दाटलेला डोळी
भिजलेल्या गौरदेही, आरस्पानी ही काचोळी
पावसाळी ऋतु जणू , मेघ मल्हाराची ताण
माती मुल्खाची सुग्रण,पावसाच्या ओठी गाणं
डोळे भरले नभाचे, धरणीच्या प्रीतिपोटी
खुळ्या पावसाची प्रीत,रानपाखरांच्या ओठी
नदी, नाले आळविती, पशु-पक्ष्यांची तहान
वृक्ष वल्लरीच्या देही, पहिल्या पावसाची खूण
अरे, पावसा पावसा, आम्ही गातो तुझी गाणी
असा ये रे ! तू बेताचा, होऊ दे रे ! आबादानी
डाॅ.धोंडोपंत मानवतकर,
२३ जलै २०२२
Leave a Reply