नवीन लेखन...

१५ ऑगस्टसाठीचे प्रश्न

श्री संदीप वासलेकर ह्यांनी १२ ऑगस्ट च्या सकाळ मध्ये उपस्थित केलेले “१५ ऑगस्टसाठी चे प्रश्न” माझयासारख्या सुजाण नागरिकांच्या मनात सतत भिरभिरत असतात. श्री संदीप वासलेकर ह्यांनी त्यांना वाचा फोडली आहे.

सर्वप्रथम मला वाटते की नागरिक शास्त्र हा ऑप्शन ला टाकायचा विषय नसावा. प्रत्येक नागरिकाला मतदानाचे महत्त्व माहीत असायलाच हवे आणि प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. मतदानाला दिलेली सुट्टी ही मजेसाठी वापरली न जावी. मतदान न केल्यास त्या दिवसाचा पगार कापला जावा. मतदान करताना सारासार विवेकबुद्धी शाबूत ठेवून योग्य त्या उमेदवारालाच मत द्यावे. लोकांना स्वच्छतेचे, वाहतुकीचे नियम पाळण्याची, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्याची सक्ती केली जावी. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांना, घाण करणाऱ्याना, कचरा करणाऱ्याना, चालत्या गाडीतून कचरा फेकणार्याना जबर दंड आणि रस्ता साफ करण्यासारखी शिक्षा दिली जावी. बर्याच ठिकाणी पालिकेने कचरा कुंडी ठेवलेली आहे – ती रिकामी असते आणि कचरा तिच्या आसपास टाकले जातो! असे का? आज पुणे शहरात सार्वजनिक शौचालये बांधली गेली आहेत – काही ठिकाणी ती बाहेरून चकचकीत आणि आतून अतिशय घाण असतात – असे का? ती घाण कोण करते? त्यातले पाणी कोण तोडते? त्याचे दरवाजे कोण घेऊन जाते? पुण्यात सध्या सायकल सेवा सुरु केली आहे. ती नागरिकांच्या सोयीसाठी आहे? ह्या सायकलीची तोडफोड कोण करते? त्या भंगारात का जातात? ठरवलेल्या ठिकाणी त्या पार्क का केल्या जात नाहीत? कुठेही त्या “पडलेल्या” अवस्थेत का असतात? मोर्चा आणि बंद च्या वेळी बस, गाड्या, दुकाने, बाईक्स ह्यांची नासधूस का केली जाते? रेल्वे आणि एस टी मधले बल्ब्स, पंखे, बसायच्या गाद्या कोण काढते आणि फाडते? हे सर्व करणाऱ्याना हेरून आणि पकडून जबरदस्त दंड लावला पाहिजे. सार्वजनिक मालमता म्हणजे सरकारची अशी जी काही अशी नासधूस करणाऱ्या लोकांची समजूत आहे ती ह्यामुळे कमी होईल. सार्वजनिक मालमता म्हणजे माझीच असून ती माझया आणि इतर लोकांनी कराच्या रूपाने भरलेल्या पैशातून आलेली आहे ही जाणीव निर्माण होईल. वाहतुकीचे नियम का पाळले जात नाहीत? पालक आपल्या छोट्या मुलाला स्कुटर वर बसवून जेव्हा जातात आणि सिग्नल तोडतात किंवा “नो एन्ट्री” मधून जातात तेव्हा नकळत मुलावर बेशिस्तीचे संस्कार करत असतात. अशी मुले सुजाण नागरिक कशी होणार? हायवे वर ट्रक वाले उजव्या बाजूने हमखास चालत असतात, कधी कधी तर तिन्ही लेन ह्या ट्रक्स नी व्यापलेल्या असतात आणि मग कार घेणून जाणार्याना कसरत करावी लागते. अशा लेन शी शिस्त न पाळणार्याना जबर दंड केला तर शिस्त येईल. परत परत बेशिस्त वाहनचालकांचा परवाना रद्द केला जावा. कुठल्याही बेशिस्तीचे दंड पण किमान दोन हजार पर्यंत असावा.

लोकांनी आपली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली की राज्यकर्त्यांना ते प्रश्न विचारू शकतात की त्यांना रस्त्याने प्रवास करताना ट्रॅफिक अडवून लोकांची गैरसोय का केली जाते? सरकारी निवासस्थानाची त्यांना खरोखर गरज आहे का? सबसिडी असणारे भत्ते आणि काही फुकट सेवा त्यांना कशाला हव्यात ? मग जनतेला असे सबसिडी असणारे भत्ते आणि सेवा का देऊ शकत नाही? एक टर्म जरी पार केली तरी आमदार – खासदार – मंत्री – संत्री ह्यांना पेन्शन का? स्वता:चे पगार आणि पगारवाढ स्वतः: कसे काय ठरवू शकतात ? मग कंपनीतले आणि कार्यालयातले कर्मचारी स्वतः: चे पगार आणि पगारवाढ स्वतः: का ठरवू शकत नाहीत? सरकारी कर्मचारी अगदी गळ्याशी आल्याशिवाय लोकांची कामे करतच नाहीत. त्यांना जाब कोण विचारणार? विचारल्यास मानसिक त्रास हे कर्मचारी साध्या नागरिकास का देतात? हे कर्मचारी लोकांची कामे करण्यासाठी ठेवले आहेत की आणखी कोणाची? लोकांची कामे करण्यासाठी आपली नोकरी आहे ही जाणीव त्यांना कधी होणार? सरकारी कर्मचाऱयांचे इव्हाल्युएशन करण्याची गरज वाटते, निदान लोकांना त्रास देणाऱयांचे तरी परीक्षण होणे जरुरीचे आहे. रस्ते खराब का होतात ? पावसाच्या आधी अथवा भर पावसात रस्त्याची कामे का निघतात? मुळात पावसात रस्ते खराब होणारच अशी आपली मानसिकता झालेली आहे म्हणून आपण घरातून लवकर निघतो आणि प्रवासात गचके सहन करतो. आपण भरलेल्या करायचे पैसे खड्ड्यात गेलेले हताशपणे पाहात असतो. परदेशात पण एवढा पाऊस पडतो पण तिकडे रस्ते वर्षानुवर्षे खराब का होत नाहीत? खराब रस्ते बनवणार्या कंत्राटदारांना मोठी शिक्षा करण्याचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी संयुक्तपणे विधेयक मंजूर केले पाहिजे. रस्त्याची छोटी मोठी कामे शहरात केली जातात, फूटपाथ खोदले जातात आणि काम झाल्यानंतर चांगले असलेल्या रस्त्याची आणि फूटपाथ ची पार वाट लावली जाते. ते पाहिल्यासारखे केले जात नाहीत. माती आणि सामान तिथेच तसेच सोडले जाते (पाहिल्यासारखे का केले जात नाही?) आणि मग त्यावर घसरून कोणी तरी दुर्दैवी दुचाकी वाला मृत्यमुखी पडतो – ह्याला जबाबदार कोण? ह्याची “अकाउंटीबिलिटी” आणली पाहिजे.

येत्या १५ ऑगस्ट ला आपल्या स्वातंत्र्याला ७० वर्षे होतील. आपल्याबरोबर अथवा आपल्या नंतर स्वातंत्र्य मिळालेले काही देश कितीतरी पुढे निघून गेले. आपली देशभक्ती फक्त ह्या दिवसापुरती आहे का? देशासाठी आपण काय करणार किंवा काय केले पाहिजे ह्याचा विचार आपल्या नागरिकांमध्ये कधी रुजणार? मी स्वतंत्र देशाचा नागरिक आहे – मी घाण करणार, बेशिस्त वागणार, वाहतुकीचे नियम मोडणार, कुठेही रांगेत उभा राहाणार नाही-मधेच घुसणार, चिरीमिरी देणार आणि भ्रष्टचार वाढवणार; हि जी मानसिकता आहे ती बदलायला हवी. विचार करा. प्रगत भारत निर्माण करण्याची क्षमता आपल्यात आहे आणि ती आपण दाखवायला हवी.

— प्रकाश दिगंबर सावंत
पुणे

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..