क्षणक्षण येते तुझीच आठवण
देवा सत्य तुची ब्रह्मांडी दिगंतर
जगव्यवहारी मी जगत रहातो
त्या जगण्यावीण नाही गत्यंतर
जगता जगताच कळूनी चुकते
आणि मीच येतो त्वरी भानावर
दिल्या घेतल्याचेच हे जग सारे
अनुभवांती उलगडती प्रीतपदर
सुख दुःख जन्मता सदा सोबती
भाळी प्रारब्धाचे भोगणे निरंतर
हा जन्म विवेकी जगण्यासाठी
खुणगाठ मनी माझिया निरंतर
मुक्तीमोक्ष जरी कुतार्थ जीवन
भगवंता मी तुज स्मरतो निरंतर
*********
–वि.ग.सातपुते. (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१९
४/१२/ २०२२
Leave a Reply