होतकरू नगरसेवकांची भरली होती सभा,
व्होटर होता सभापती मधोमध उभा.
व्होटर म्हणाला, व्होटर म्हणाला, “मित्रांनो,
देवाघरची लूट.. देवाघरची लूट !
तुम्हां अम्हां सर्वांना एक एक व्होट
या व्होटाचे कराssल काय ?”
वाघ म्हणाला, “अश्शा अश्शा, व्होटाने मी काढीन नीविदा.”
ईंजीन म्हणाले, “ध्यानात धरीन, ध्यानात धरीन
मीही माझ्या व्होटाने, असेच करीन, असेच करीन,”
चक्र म्हणाले, “सत्तेत येण्या साssठी, शेपूट हलवीत राssहीन.”
कमळ म्हणाले, “नाही ग बाई, वाघासारखे माझे मुळीच नाही,खूप खूप व्होट मिळतील तेंव्हा परिवर्तन करेन , परिवर्तन करेन.”
झाडू म्हणाली, “पडेल थंडी ,तेव्हा माझ्या मफलराची मलाच बंडी.”
अपक्ष म्हणाले, “कधी इथे, कधी तिथे, कुंपणावरून मी मारीन उड्या.”
पंजा म्हणाला, “व्होटर म्हणजे दोन हात, दोन हात.
बुडत राहीन प्रवाहात, बुडत राहीन प्रवाहात.”
एम आय एम म्हणाले, “माझे काय ?”
“तुझे काय ? हा हा हा !
तू येथून घे काढता पाय.”
घड्याळ म्हणाले, “टिक टिक करून वेळ मी धरीन, वेळ मी धरीन
पावसाळ्यात धरण मी भरीन.”
व्होटर म्हणाला, “छान छान !
मतदाराच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या व्होटाचा उपयोग करा.”
“नाही तर काय होईल ?”
“बिन कण्याच्या “शेजार्यागत”, आपुली लोकशाही मरुन जाईल.”
Leave a Reply