|| हरि ॐ ||
आपल्या प्रत्येकाला कधी जमिनीचे, राहायच्या जागेचे, किंवा गावाच्या शेती संबंधित व्यवहारासाठी गावाच्या तलाठ्याकडे तर कधी तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कचेरीत जाण्याची वेळ येते. अश्या कार्यालयीन कामकाजात बऱ्याच वेळा ७/१२ (सात बारा), गाव नमुना किंवा हक्काचे पत्रक किंवा गाव नमुना नंबर ६ (फेरफार) असे शब्द वारंवार कानावर पडतात पण त्याचा अर्थ लागत नाही. लहान असताना घरातील जेष्ठ व्यक्ती असे सर्व व्यवहार पाहत असल्याने आपल्यास याबाबत काही माहिती नसते किंवा माहिती करून घेण्याचे कष्ट आपण घेत नाही. पण जमिनीचे, घराचे किंवा शेतीचे व्यवहार अंगावर पडले की जाग येते. आपण अश्याच काही गांव नुमुन्यांविषयीची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ (महराष्ट्र लॅण्ड रेव्हेन्यू कोड) अन्वये प्रत्येक गावातील जमिनीच्या कागद प्रत्रांच्या नोंदी ही त्या त्या गाव तलाठी कार्यालयात केलेल्या असतात. आता आशा नोंदी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटस् इंटरनेटवरून पाहत येतात व घर बसल्या ७/१२, गावाचा नमुना नंबर ६ (फेरफार) किंवा अन्य अधिकृत कागदपत्रांची नोंद झाली आहे किंवा नाही तेही बघता येते आणि त्याच्या प्रिंटहि घेतात येतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात. तलाठी दप्तर नमुना नंबर 1 ते 21 गाव नमुन्यांमध्ये असते. या नोंदवहीस वेगवेगळे अर्थ असतात. आपणास आवश्यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबतची माहिती पुढील प्रमाणे :-
१) गाव नमुना नंबर-1, या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
२) गाव नमुना नंबर-1अ, या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
३) गाव नमुना नंबर-1ब, या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
४) गाव नमुना नंबर-1क, या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
५) गाव नमुना नंबर-1ड, या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
६) गाव नमुना नंबर-1इ, या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
७) गाव नमुना नंबर-2, या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
८) गाव नमुना नंबर-3, या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीची नोंद पाहता येते.
९) गाव नमुना नंबर-4, या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
१०) गाव नमुना नंबर-5, या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
११) गाव नमुना नंबर-6, (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
१२) गाव नमुना नंबर-6अ, या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
१३) गाव नमुना नंबर-6क, या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
१४) गाव नमुना नंबर-6ड, या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
१५) गाव नमुना नंबर-7, (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
१६) गाव नमुना नंबर-7अ, या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
१७) गाव नमुना नंबर-8अ, या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
१८) गाव नमुना नंबर-8ब, क व ड, या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
१९) गाव नमुना नंबर-9अ, या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
२०) गाव नमुना नंबर-10, या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
२१) गाव नमुना नंबर-11, या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
२२) गाव नमुना नंबर-12 व 15 या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
२३) गाव नमुना नंबर-13, या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
२४) गाव नमुना नंबर-14, या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
२५) गाव नमुना नंबर-16, या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
२७) गाव नमुना नंबर-17, या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
२८) गाव नमुना नंबर-18, या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
२९) गाव नमुना नंबर-19, या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
३०) गाव नमुना नंबर-20, पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
३१) गाव नमुना नंबर-21, या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.
— जगदीश पटवर्धन
Sir mi he Ghar ghetle ahe te city survey la lagu nahi tar te Ghar mazya naave hoil Kay
Joone ferfer
जुने सर्व्हे नंबरचे सातबारा मिळतात का आणि त्यासाठी काय करावे लागेल
Gat no 631 beed distric gaon ravlsgaon June ferfar
Gat no 631 June ferfar
मला माझ्या वडीलांची शेती ची माहिती बघायची आहे
मला माझ्या वडीलांची शेती ची माहिती बघायची आहे
मि शेती मजूर आहे
Nod
वही
Sar Aamcha shet 1954 sali atikarman kelel Aahe tar tyasathi Aami dand hi bharla Aahe tari Aamchya shetacha patta Aajun basla nahi Aamala patta milelki nahi sar