नवीन लेखन...

गणपति : विज्ञानयुगीन उकल : गजानन-स्वरूपाचें नव-विश्लेषण

गजानन हा गणांचा प्रमुख आहे. गण म्हणजे समूह. पूर्वी भारतात गणराज्यें होती, तेव्हां गण या शब्दाचा ‘समूह’ हाच अर्थ प्रचलित होता. आजही आपण ‘भारतीय गणराज्य’ अशा नामाभिधानात याच अर्थानें हा शब्द वापरतो. आपलें राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ यातही हाच अर्थ अभिप्रेत आहे.

तेव्हां, गणाधीश म्हणजेच ‘समूहाचा प्रमुख’. आतां प्रश्न असा उठतो की, हा समूह कुठला ? तर, हा समूह म्हणजे, ‘देवांचा समूह’, म्हणजेच, ‘परग्रहावरून अवकाशयानातून (स्पेस-शिप मधून) पृथ्वीवर उतरलेला परग्रहवासी अवकाशप्रवाशांचा (‘स्पेस-ट्रॅव्हलर्स’चा) समूह’.

अवकाशप्रवासी म्हणजेच अंतराळयात्री (अर्थात् स्पेस-ट्रॅव्हलर्स, ऍस्टोनॉटस् ) कसे दिसतात याचें कल्पना-चित्र शेकडो वर्षांपूर्वी काय, तर शंभर वर्षांपूर्वीसुद्धा कुणाला काढतां येणें शक्य नव्हतें. पण मानव आतां अंतराळात गेलेला आहे, अवकाश-वासामध्ये (‘स्पेस-स्टेशन’वर) रहातो आहे, त्यातून बाहेर पडून अवकाश-भ्रमण करतो आहे, चंद्रावर पोचलेला आहे. त्यामुळे आतां, आपणां सर्वांना ‘स्पेस-सूट’, (म्हणजेच अवकाशप्रवाशाचा, जाड कवच व तसेच शिरस्त्राण, हा वेश), कसा दिसतो, याची कल्पना आहे. तेव्हा, आपण त्या स्पेस-सूट चें रूप ज़रा पाहूं या.

रूप :
अवकाशप्रवाशानें घातलेला हा स्पेस-सूट, दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगलाच जाडजूड आहे. त्यामुळे हा ‘स्पेस-ट्रॅव्हलर’ चांगलाच स्थूल व विशाल-उदर दिसतो आहे. या व्यक्तीनें श्वासोछ्वासासाठी एक मुखवटा (हेलमेट अथवा गॅस-मास्क) घातलेला आहे, व त्यातून एक लवचिक-नळी (फ्लेक्सिबल-ट्यूब) बाहेर आलेली आहे, जी पाठीमागील प्राणवायूच्या (किंवा त्या परग्रहवासीयाच्या जीवनाला आवश्यक अशा तत्सम अन्य वायूच्या) टाकीला जोडलेली आहे. टाकी पाठीवर असल्यामुळे दिसत नसली तरी, नळीचें खालचें टोक कंबरेपर्यंत गेलेलें दिसत आहे, व तिथून तें मागील बाजूस गेलें आहे. हा मुखवटा व ही नळी, अनुक्रमें हत्तीचें तोंड व सोंड यांसारखी दिसताहेत.

या व्यक्तीच्या तोंडाजवळ एक फ्लेक्सिबल-शाफ्ट असलेला मायक्रोफोन आहे, ज्याच्याद्वारें ती व्यक्ती बोलूं शकते. ऑफिसमधील टेलिफोन-ऑपरेटर वापरतात, किंवा हल्ली कंप्यूटरवर चॅट करतांना वापरतात, तसा हा लवचिक-दांड्याचा ( फ्लेक्सिबल् ) मायक्रोफोन आहे. त्याचें वरचें टोक, गालाजवळ, मुखवट्यावर बसवलेलें आहे, व त्याचें खालचें टोक, साहजिकच, बोलण्यासाठी, कडेनें पुढे, तोंडाजवळ, वळवून घेतलेलें आहे. हा मायक्रोफोन, हत्तीच्या एक मोठ्या सुळ्यासारखा दिसतो आहे.

या व्यक्तीच्या मुखवट्यावर दोन्हीबाजूंना कानाजवळ, ऐकण्यासाठी, मिनिएचर ‘डिश-ऍन्टेना’, म्हणजेच बशीच्या आकाराचे ‘साउंड-रिसीव्हर’ बसवले आहेत, (ज्यांच्यामुळे चहूंबाजूचे ध्वनी केंद्रित होतात, व त्यामुळे दूरवरचे लहानलहान व अस्पष्ट ध्वनीसुद्धा त्या व्यक्तीला स्पष्ट ऐकूं येतात). या ‘डिश-ऍन्टेना’, हत्तीच्या भल्यामोठ्या, सुपासारख्या कानांप्रमाणेच दिसत आहेत.

ही गोष्ट उघड आहे की, प्रागैतिहासिक काळातील मानवांना ‘स्पेस-सूट’ वगैरे गोष्टींचे ज़राही ज्ञान नव्हतें. त्यामुळे, परग्रहवासी-अवकाशप्रवाशाचें दर्शन झाल्यावर त्या लोकांनी स्वत:ला व इतरांना समजेल अशा संज्ञा वापरून त्याचें वर्णन केले. म्हणून तो परग्रहवासी-अवकाशप्रवासी, ‘गजानन’ म्हटला गेला.

वाहन :

भूप्रदेशावर प्रवास करण्यासाढी या अवकाशप्रवाशाकडे एक ‘ग्राउंड-कार’ आहे. (म्हणजे, स्पेस-क्राफ्ट नाहीं, असे वाहन). हें वाहन पृथ्वीग्रहावर, जमिनीवरून, पाण्यातून, अथवा आकाशातून-कांहींसें-उंचावरून, प्रवास करू शकणारे, असे आहे. अर्थातच, या वाहनाला घोडे, बैल, गाढवे, असे कुठलेही प्राणी जुंपलेले नाहींत; हें वाहन मोटारीप्रमाणे आतील इंजिनवर चालतें.

फोक्सवॅगन कंपनीची ‘बीटल्’ ही मोटार प्रसिद्धच आहे, व या मोटारचा आकार खरोखरच बीटल् या किड्यासारखाच बनवलेला आहे. त्याचप्रमाणे, अवकाशप्रवाशाची ही
‘ग्राउंड-कार’, हें द्रुतगतीनें धावणारें वाहन, एखाद्या उंदराप्रमाणे, आणि पाठीमागील धूम्ररेषा (एक्झॉस्ट-गॅस) ही उंदराच्या शेपटीप्रमाणें, भासल्यास नवल नव्हे. ज्याप्रमाणे अवकाशप्रवाशाचें वर्णन ‘गजानन’ असें केलें गेलें, त्याचप्रमाणें त्याच्या वाहनाला ‘उंदीर’ म्हटलें गेलें.

आयुधें व हातांमधे धरलेल्या इतर वस्तू :

गजाननाच्या हातात, शूल, परशू, अंकुश, गदा, पाश, तुटलेला दात, शंख, मोदक इत्यादी वस्तू दाखवलेल्या असतात.

शूल, परशू, कुश, गदा ही आयुधेंच आहेत. आपण , शूल, परशू, दात, पाश यांऐवजी ‘नीडल्-गन’, ‘स्टन्-गन’ (ही ‘गन्’ शरीराला ‘स्टन्’ करते, म्हणजेच शरीराची हालचाल गोठवून टाकते, असे ‘सायन्स-फिक्शन’ कथांमधे कल्पलेलें आहे), ‘लेझर-गन’, ‘लाइट-सोर्ड्’ (हें ‘प्रकाश-खड्ग’ आपण ‘स्टार-वॉर्स’ सिनेमांमधे पाहिलेलें आहे), ‘न्यूरॉनिक व्हिप’ (हा शब्द डॉ. आयझॅक ऍसिमॉव्ह यांच्या कादंबर्‍यांमधे येतो; व हा माणसाच्या मेंदूमधील न्यूरॉन्सवर वेदनामय परिणाम करतो, अशी संकल्पना आहे), असे विज्ञानयुगीन शब्द वापरू या.

गदा, शंख, मोदक यांऐवजी, आपण ‘बाँब’, ‘हँड-ग्रेनेड’, ‘ब्लास्टर’, ‘इम्पॅक्टर’, एनर्जी-बोल्ट’ अशा आधुनिक शब्दांचा उपयोग करू या.

मग गणपतीच्या हातातील वस्तूंचा अर्थ लागलीच स्पष्ट होतो.

( इथें एक प्रश्न मनात येऊं शकतो की, गणपतीच्या हातांतील वस्तूंमधे धनुष्याचा समावेश कसा नाहीं ? अहो, धनुष्यापेक्षा कैकपटींनी प्रगत आयुधें ज्याच्याकडे असतील, त्याला धनुष्याची गरजच काय? किंबहुना, त्या अवकाश-प्रवाशाचे कुठलेही हत्यार धनुष्याप्रमाणे दिसत नाहीये, म्हणून ‘गणपती’च्या हातात धनुष्य नाहीं ).

अशी अतिशक्तिशाली आयुधें धारण करणार्या व्यक्तीपुढे नतमस्तक होण्याव्यतिरिक्त, आणि त्याला अग्रपूजेचा मान दिल्याशिवात, अन्य पर्यायच नाहीं.

— सुभाष स. नाईक.
मुंबई.
M – 9869002126.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..