नवीन लेखन...

पाथरवट ( दगड फोड्या) – झेन कथा

एका गावात एक पाथरवट ( दगड फोड्या) राहत होता. तो रोज भल्या पहाटे आपला डोंगरावर जाई आणि मोठ्या शिळा फोडून, त्यांचे तुकडे गावातील शिल्पकारांना विकत असे.

एकदा असाच तो शिळा फोडत होता. दुपारची वेळ… वरुन सूर्य आग ओकत होता.  दगड फोड्याने थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. त्याने वरुन बघितल तर राजाचा एक मोठा अधिकारी रस्त्यावरून पालखीतून मोठ्या मजेत चालला होता. आजूबाजूला सेवक वर्ग त्याची सेवा करत होते. त्याला ना उंहाची पर्वा होती ना पाण्याची!
दगड फोड्या स्तिमित झाला. म्हणाला “अहाहा!! काय सुंदर जीवन आहे. काही त्रास नाही, काही कष्ट नाहीत !! हा माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. मी जर हा अधिकारी असतो तर काय मजा आली असती.” काय आश्चर्य!! तो दगड फोड्या पुढच्याक्षणी तो अधिकारी झाला.

आता तो मजेत होता. काही कष्ट नाहीत. फक्त आराम ! काही तास जातात न जातात तोच त्याची पालखी मोडली. तो नाइलाजानेच खाली उतरला आणि पायी चालू लागला. वर सूर्य होताच आग ओकत. याने विचार केला, माझ्यापेक्षा हा सूर्य किती श्रेष्ठ आहे. काही त्रास नाही. काही कष्ट नाहीत. काय आश्चर्य!! तो दगड फोड्या पुढच्याचक्षणी सूर्य बनला.

आता तो खुशीत होता. मस्त आकाशात विहार करायचा. काही कष्ट नाहीत. फक्त आराम ! आता तो लोकांना छळत होता. अशी त्याची मजा चालू असताना त्याला गुदमरल्यासारखा झाल. काही दिसेचना पुढच ! बघतो तर काय ! अचानक एक ढग त्याला आडवा आला होता. काही केल्या तो ढग हटेचना. त्याने विचार केला हा ढग जर मला अडवू शकतो तर हा माझ्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ दिसतोय. जर मी ढग झालो तर !! तर मग मीच सर्वात श्रेष्ठ होईन. आणि नेहेमीप्रमाणेच, तो ढग बनला. आता त्याने सूर्यालाही नमविल होत. आता तो सर्वशक्तिमान होता. मजेत आकाशात विहरत होता. सूर्याला झाकोळून टाकत होता.

इतक्यात तो एका दिशेला खेचला जाउ लागला. त्याला तिकडे जायच नव्हत. पण वारा त्याला खेचत होता. त्याने विचार केला हा वारा जर मला ढकलु शकतो तर हा माझ्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ दिसतोय. जर मी वारा झालो तर !! तर मग मीच सर्वात श्रेष्ठ होईन.

आत्ता तो वारा बनला होता. त्याला ना राजाची भीती , ना सूर्याची, ना ढगाची !! तो मुक्त हस्ते बागडत होता. ढगाना हलवून सूर्याला झाकत होता.

दाणदिशी तो एकठिकाणी येऊन आदळला. समोर बघतो तो काय एक महाकाय पर्वत त्याच्या समोर उभा होता. त्याला हलतही येईना न पुढेही जाता येईना.  त्याने विचार केला हा पर्वत जर मला ढकलु शकतो तर हा माझ्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ दिसतोय. जर मी पर्वत  झालो तर !! तर मग मीच सर्वात श्रेष्ठ होईन.

आणि तो पर्वत झाला. त्याला ना राजाची भीती , ना सूर्याची, ना ढगाची, ना वार्याची !! तो घट्ट मांडी ठोकून बसला होता. सगळ्यावर हसत होता. स्वतावरच खुश होत होता. तो जगात आता सर्वश्रेष्ठ, सर्व शक्तिमान होता.

त्याने खाली बघितले. त्याच्या पायाखालची जमिनच सरकली…

दुसरा कोणी एक पाथरवट त्याची मांडी फोडत होता…

— दीपक गायकवाड
आदित्य ॲकॅडमी

 

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

1 Comment on पाथरवट ( दगड फोड्या) – झेन कथा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..