आदेश श्रीवास्तव हे अभिनेता बनण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीत आले होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९६४ रोजी झाला.”अंगारे‘ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. नंतर तब्बल दशकभर त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत काम केले. सन १९९३ मध्ये ‘कन्यादान’ या चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर १०० हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यात ‘चलते चलते’, ‘बाबुल’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनिती’ या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत लक्षवेधी ठरले. त्यांनी ‘सना’ या लघुपटाचे दिग्दर्शनही केले.
आदेश यांना २०११ मध्ये कॅन्सर झाला होता. मात्र, त्यावर त्यांनी मात केली. आजारपणानंतर पुन्हा संगीतक्षेत्रात कार्यरत होत त्यांनी ‘वेलकम बॅक’ या सिनेमाला संगीत दिले. हा त्यांचा संगीत दिग्दर्शक म्हणून अखेरचा सिनेमा ठरला. आदेश श्रीवास्तव यांचे निधन ५ सप्टेंबर २०१५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply