नवीन लेखन...

आहाररहस्य १

यापूर्वीच्या भागांमध्ये  उपवासाविषयी बहुतेक माहिती आपण घेतली.

आता प्रत्यक्ष आहाराविषयी बघूया

त्याआधी ग्रंथातील एक अत्यंत महत्वाचे सूत्र अभ्यासूया. जे सूत्र पुढील सर्व टीपांसाठी प्रमाण आणि मुलभूत ठरणारे आहे.

दूष्यम् देशम् बलम् कालं
अनलं प्रकृती वयः ।
सत्वम् सात्म्यं तथा आहारम्
अवस्थाश्च पृथक् विधः ।।

या काही गोष्टींचा विचार एखाद्या रोगाचे निदान करताना आणि चिकित्सा देताना करावा, असे शास्त्रकार म्हणतात.

रूग्णाची दोष आणि दूष्य स्थिती, शरीरस्थिती, रूग्ण रहातो तो प्रदेश, रूग्णाचे शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक बल म्हणजे ताकद जाणून घेणे, रुग्णाचे वय, भूक, पचनशक्ती, त्याची प्रकृती, रूग्णाची मानसिक शक्ती, त्याची सहनशक्ती, आणि त्याचा आहार कसा आहे, हे नीट अभ्यासून निदान आणि चिकित्सा ठरवावी लागते.

या दहा गोष्टींचे ” परम्युटेशन काॅम्बीनेशन” करावे लागते, जो एक जाणकार अनुभवी वैद्यच करू शकतो. हे “काॅम्बीनेशन” समजून, विवेक वापरून ठरवावे लागते. त्यात आहार हा एक मुद्दा आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.

शिवाय या प्रत्येकाचा प्रत्येकाशी संबंध आहे. विषय आहाराचा असल्याने, आहाराचा या प्रत्येकाशी संबंध जाणून घेतला पाहिजे.

लहानपणीचा आहार, तरूणपणीचा आहार, वृद्धावस्थेतील आहार, वेगवेगळा असतो. जसे लहान मुलांची प्रकृती कफाची असते. तरूणपणाची ती पित्ताशी जवळ होते, तर वृद्धावस्थेतील प्रकृती वाताच्या आधिक्यात असते. तसा वयानुसार आहार घेतला गेला पाहिजे.

एखादा रूग्ण देशावरचा असेल तर तेथील हवा कोरडी असते. कोकणातला असेल तर कोकणातील हवेत आर्द्रता जास्त असते. घाटावर ऊष्णता असली तरी घाम येत नाही, पण कोकणात घामाच्या धारा निघतात. या वातावरणातील बदलामुळे तिथला आहारदेखील बदलला जातो.

कोल्हापूरला मिळणारी मिसळ बघीतली तरी कोकणी माणसाला आग व्हायला लागते. एवढा तेलाचा लालबुंद कट असतो. कोल्हापुरी रूक्ष हवेला तो कट तसाच आवश्यक असतो. पण कोकणात एवढं तेल वापरून नाही चालत, इथे ओला नारळ जेवणात जास्त असतो. कोकणात नारळ तर घाटावर शेंगदाणे हे समीकरणच आहे

कोकणात जेवणानंतर ओल्या नारळाचा तुकडा चघळायला हवा तर घाटावर चार शेंगदाणे तोंडात टाकलेच पाहिजेत.  दोन्हीकडे गुळ काॅमन. असे मुलभूत फरक असतात ते देश विचारामुळे.

लहानपणी दूध हे पूर्णान्न आहे. पण जसजसे वय वाढते, तसे दूध कमी करावे लागते. दुध पूर्ण अन्न आहे, मला आवडते, म्हणून मी तेच पिणार, असे जर एखाद्याने ठरविले, तर ते चूक होते.

एखाद्याची प्रकृती वाताची असेल त्याला नारळाचा रस आणि पुरणपोळी आवश्यक असते, तोच एखादा पित्ताचा असेल तर हीच पुरणपोळी तुपाबरोबर खावी. आणि एखादा कफप्रकृतीचा असेल तर पुरणपोळी खात असताना कटाच्या आमटीचा भुरका मारावा. आणि आवड निवड पण येतेच ना. ज्याला पुरणपोळी आवडतच नाही, त्याला एक चतकोर पण पचणार नाही, पण ज्याला मनापासून आवडते तो, सात दिवस पुरणपोळी वरच राहू शकतो.

जसा देश जसा वेश तसे खावे…
जशी प्रकृती जशी पचनशक्ती तसे पचवावे…

चुकत कोणीच नाही, पण हे परम्युटेशन काॅम्बीनेशन चुकले की, पद्धत बरोबर असली तरी, आहाराच्या गणिताचे ऊत्तर चुकलेच म्हणून समजा.

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021

12.08.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..