शाळेत जाताना पाण्याच्या बाटल्या किती पालकांनी नेल्या आहेत ?
मला तर आठवतच नाही. कधी न्यावीच लागली नाही. शाळेत स्टीलचे पिंप ठेवलेले असायचे. खेळून झाले की, धावत पहिल्यांदा जाऊन पिंपातले पाणी पिण्याची मजा काही औरच होती.
संपली ती मजा !
घरचा डबा नेला असला तरी पाणी शाळेतलंच !
मला आठवतंय, पाण्याची बाटली फक्त वार्षिक सहलीच्या वेळी कपाटावरून खाली यायची, सहलीवरून परत आलो की, फिरकीच्या झाकणाची बाटली परत कपाटावर. तेव्हा कुठे कोणाला मूतखडे होत नव्हते ते. आणि आज एवढं पाणी ढोसूनही मुतखडे मात्र वाढतातच आहेत.
गेले ते दिवस…..
आता प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी बरोबर न्याव लागतं. प्लॅस्टीक इज इन्ज्युरस टु हेल्थ, हे माहिती असून देखील सुशिक्षित साक्षर पालक आपल्या पोटच्या गोळ्याला ( प्लॅस्टिकच्या ) “बाटलीतलं पाणी संपूवनच यायचं हं” असा सज्जड दमही भरतात. पोरं बाबडी ढोसताहेत पाणी, आणि सू सूला झालं तरी जात नाहीत. हा होणारा मूत्र वेगावरोध पुढे मुतखड्याचे कारण बनतो.
बदलंवलय सगळं….
तहान लागली की तहाने एवढेच पाणी प्यावे. हा साधा नियम पण आम्ही बदलून टाकलाय….
सात आठ लीटर पाणी दिवसभरात पोटात गेलेच पाहीजे, हा नियम ना अॅलोपॅथीच्या टेक्स्ट मधे आहे, ना होमियोपॅथीमधे, ना आमच्या आयुर्वेदात ! आला कुठुन हा नियम ? (पाण्याविषयी सविस्तर लेखमालाच आता लिहिणार आहे. )
सारंच बदललंय !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
04.12.2016
Leave a Reply