नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २२

श्लोकातील पुढचा शब्द आहे, ग्राम्यौदक आनूपरसः
ग्राम्य म्हणजे गावातील.
गावातील काय काय ?
रस म्हणजे जल किंवा पाण्याशी संबंधीत, आनूप म्हणजे पाणथळ ओलसर जागी रहाणारे पशुपक्षी, प्राणी, मासे, त्यांचे मांस दूध आदि. तसेच या प्रदेशातील फळे, पालेभाज्या इ पिके. एवढी या विषयाची व्याप्ती आहे. हे केवळ उक्त आहे. न सांगितले गेलेले ते तेवढेच अनुक्त आहे. अनुक्त म्हणजे याप्रमाणे इतर आपण जाणून घ्यावेत या अर्थी.

केवळ गावातील आणि जंगलातील प्राणी यांच्या स्वभावानुसार त्यांचे गुणधर्म बदलतात. परिणाम बदलतात. त्यामुळे गावातील प्राणी आणि गावात न रहाणारे जंगली प्राणी यांच्या मांसात फरक असतो.
जसे, गावातील प्राण्यांची वाढ ही थोडी जास्ती होते. जंगलामधे राहणाऱ्या प्राण्यांच्या तुलनेत गावामधे फिरायला जागा कमी असते. त्यामुळे व्यायाम कमी होतो. मृत्युची भीती जंगलात जास्ती असते, त्यामुळे अन्न सेवन करीत असताना देखील सतत मान वर करून इकडे तिकडे लक्ष ठेवून आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जीव वाचेपर्यंत धावावे लागते. तसे गावातील प्राण्यांचे होत नाही. तसे ते सुरक्षित असतात.

कालमानानुसार गावातील प्राण्यांमधे परत दोन प्रकार पडतात. आपले अन्न आपणच शोधून खाणारे गावातील प्राणी जसे कावळा, चिमणी, गावठी कोंबडी इ. आणि अन्नासाठी माणसावर अवलंबून असणारे खुराड्यात वाढवलेले पाळीव प्राणी जसे पाळलेली बदके, डुकर, ब्राॅयलर पक्षी इ.

खुराड्यात ज्यांना माजवले जाते, ते प्राणी तुलनेत जास्त सुस्त असतात, गुबगुबीत, मांसल, धष्टपुष्ट असतात. यांचा व्यायाम जवळपास नसतोच. वजनही जवळ जवळ दुप्पट असते. अंगावर चरबी जास्ती असते. हे प्राणी पाळले जातात ते काही केवळ हौस किंवा भूतदया म्हणून नाही तर त्यापासून फक्त पैसा आणि पैसाच मिळवायचा असतो. मग ते बोकड असो वा कोंबडं किंवा डुक्कर असो वा बदक. भारतात अजून तरी गाई म्हैशी बैल रेडे त्यांची वासरे, ही दुधासाठी आणि शेतीकामासाठी वाढवली जातात. पण पाश्चात्य जगात यांचे मांस हा व्यापाराचा मुख्य पदार्थ आहे. आता भारतात देखील तोच दृष्टीकोन राबवण्यात पाश्चात्य तरबेज व्हायला लागले आहेत. आणि भारतातले अहिंसेचे पुजारी, हिंसेच्या मार्गाने जायला लागले आहेत. असो.

खा. खा. खायला घालायचे, मांस आणि चरबी वाढवून वजन वाढवायचे, त्यासाठी काही विशिष्ट औषधी खायला घालायची आणि हार्मोन्सची सूचिकाभरणे (म्हणजे इंजेक्शन) टोचायची, गलेलठ्ठ करून वजन वाढवून विकायची असा सगळा बिझनेस असतो. त्या प्राण्यांच्या आरोग्याची कोणालाही कसलीच काळजी नसते.

ब्राॅयलर कोंबड्याचे म्हणाल तर साधारणपणे पंचेचाळीस दिवसाची ब्राॅयलर कोंबडी साधारणपणे दोन ते सव्वादोन किलोची होते. तर त्याच वयाची गावठी कोंबडी फक्त नऊशे ग्रॅम ते एक किलो वजनाची असतात. यावरून अंदाज येईल की गावातील खुराड्यात वाढवलेले प्राणी आणि मोकळेपणाने फिरणारे प्राणी यांच्या वजनात एवढा फरक का येतो ते !

असे माजवलेले प्राणी खाल्ले की त्यांचे मांस पचवायला देखील तेवढीच जास्त चरबी संपली पाहिजे.तेवढाच जास्त व्यायाम झाला पाहिजे जर तेवढा व्यायाम, कष्ट झाले नाहीत आणि ती वाढलेली चरबी जर संपली नाही, तर प्रमेह ठरलेला.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.02.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..