सायंकाळची वेळ होती .
आई रोजच्यासारखी घरातील कामं करीत होती .
रविवार असल्यानं बाबा बाहेरगावी काही कामानिमित्त गेले होते .
दिवसभर निवांतपणे ती तिची कामे करत होती .
मुलांना आज खेळायला मुभा होती .पण झोपण्यापूर्वी दोन तास तरी अभ्यास करून घ्यावा असा आईचा नेहमीची शिस्त होती .
परीक्षाही जवळ आlल्या होत्या .
तिने मुलांना हाक मारली .
” मधू, रवी चला आता. खूप झालं खेळणं. हातपाय धुऊन या जेवायला.”
मधू असेल सहा सात वर्षाचा तर रवी त्यापेक्षा मोठा दहा वर्षाचा . दोघेही मुलं फार चुणचुणीत होती . आई बाबाचे सर्व ऐकणारी . शिवाय शेजाऱ्यापाजारऱ्याचं बारीकसारीक काम ऐकणारी .त्यामुळे सगळ्यांची लाडकी होती .वर्गातही पहिला -दुसरा नंबर नेहमीच आणणारी .
आईच्या हाके मधू आत आला .
” आई, आई”
मधु सांगू लागला, ” तुला माहिती नाही. रविदादा कधीचा अंगणात उभा आहे.दिवसभर काही खाल्लेल नाही.अन तू म्हणते पुरे झालं..खेळणं म्हणूंन ..”
आईच्या लक्षात आलं .हातातील कामं सोडून ती बाहेर आली .
मधुही पाठोपाठ आला .
” बापरे, देवा गा….” करीत आई रवीजवळ आली. बाहेर सर्वत्र अंधाराल होतं. रवी डगमगत उभा होता. तिने त्याला उचलू कडेवर घेतले.रडत रडत आई त्याचे मुके घेऊ लागली.
” वेडा कुठला ? असं कुणी करतं होय?” म्हणत घरात घेऊन आली.
रवीच्याही डोळ्यातून आसवं येऊ लागली .पण ती आनंदाची होती . आईनं आपल्याला माफ केलं .प्रेमाने जवळ घेतलं ..याचंच त्याला फार आनंद झालं होता ..रवीला.
दोघंही रडत होती .
आई मधूला व रवीला पोटाशी धरून स्वयंपाक घरात बसली .
” माझी गुणांची पोरं, शहाणी बाळं” असे म्हणत दोघांनाही कुरवाळू लागली.
मधू सांगू लागला , ” आई सांगू का ? दुपारपासून रविदादा अंगणात उभा आहे. मी त्याला सावलीत यायला सांगितलं . तरीही तो आला नाही . तुझं लक्ष नसताना मी त्याला खाऊ नेऊन दिला तर तोही दादाने खाल्ला नाहीच .
उलट आई रागावेल म्हणून घरात परत ठेवायला सांगितलं . काही बोलतही नव्हता . नुसता रडत होता .तू त्याला घराबाहेर काढलं आन विसरलीही . दादा नुसता एका जागेवर उभा होता . उन्हामुळं जागा किती गरम होती ..तरी एक पाय भाजला की दुसऱ्या पायावर उभा राहायचा .
मी त्याला सॅंडल नेऊन दिलि तरी नाहीच घातली त्यांन. मी येथे दरवाज्यात बसून त्याला गोष्टी सांगत होतो ..पण हसत नव्हता . तू मात्र खुशाल दुपारी झोपली ..विसरली दादाला शिक्षा दिल्याचं …दुष्ट कुठली ?”
मधुच्या दुष्ट कुठली या शब्दानं तिला जोराचा हुंदका आला .
रवीला अधिकच जवळ घेत ती रडू लागली . आसवं रवीच्या गालावर पडल्यानं पडल्यानं वेळ अबोल असणारा रवी आईचे अश्रू पुसत म्हणाला ,” आई , तू दुष्ट नाहीच , त फार छान आहेस . दुष्ट आहे तो मी , मी तुझं ऐकलं नाही . प्लिज आई रडू नकोस गं .”
रवीच आईचेआसवं पुसत समजावत होता .
कुठल्याशा कारणानं चिडून आई रवीवर रागावली होती .” जा घराबाहेर..दिवसभर तुला जेवणचं बंद..अंगणातच उभं राहायचं…हीच तुला शिक्षा.”
रवी खरंच निमूटपणे अंगणात भर उन्हात उभा राहिला .. अनवाणी.उपाशी ..
छोटा मधू विनवणी करत होता तरी नाही ऐकलं त्याचं .आई स्वतःयेईल. मला बोलावेल.याची वाट बघत बसला.
इकडे आईला विसरून गेली होती शिक्षेचे .
मुलं असावीत खेळत ..असं समजून ….
तिला पश्चाताप झाल्यासारखे झाले . दोघांनाही आपल्या हाताने घास भरवू लागली .
मधू त्याला भरवता असलेला घास आईचा हात रवीच्या दिशेन नेत होता .
ज अभ्यास नको म्हणून आईने दोघांनाही झोपायला नेलं .
आई खूप वेळ जागीच होती .
रवीच्या पायाला तेल लावीत , मालिश करीत .
झोपेतही रवी मात्र हसल्या सारखा दिसत होता … त्याला आईने माफ केले ..जवळ घेतले म्हणून .
आई मात्र रात्रभर जागीच….
स्वतःला म्हणत ….
“मी खरंच दुष्ट आहे, दुष्टच आहे मी”
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply