— कवी – कुशल डरंगे
आम्ही साहित्यिक ग्रुपमधून
मी सदैव जपतो
आज सार आठवतो
ताई तुझं प्रेम साठवतो
रक्षण करण्यास हात पुढे करतो
आज आहे रक्षाबंधन
भरून आले हे नंदन
बहीण भावाचे हे स्पंदन
नात्यात फुलवी सुगंधी चंदन
बहिणीने बांधली राखी आज
भावाच्या हातावर उजळला साज
या बंधनात नसते कसले व्याज
नाही उमगले या नात्याचे राज
महत्व जाणले धाग्याचे
नाते जपले कृष्णाने द्रौपदीचे
हुमायूने केले रक्षण राणी कर्मवतीचे
दाखवून दिले नाते बहीण भावाचे
नका दाखवू असला माज
आहे कोणाची बहीण वाटू द्या लाज
स्वच्छंदी तिचा सजलेला असतो साज
कलियुगात बहिणीला नको असले भाऊ आज
— कुशल डरंगे
Leave a Reply