आज मज कळो यावे,का रिकामे आपुले आभाळ, अनभिषिक्त प्रेम चांदणे,
नाहीसे का आज ओढाळ,–!!!
मंदमंद प्रेम प्रकाश,
हळूहळू नाहीसा होई,
जीवनीचा तम मग,
बघ, कसा वाढत जाई,–!!!
रोज रोज अमावस,
असे कसे चालायाचे,
रात्रंदिनी निष्प्रभ खास,
चंद्र – चांदणे मज भासे,—!!!
अनुभवल्या जिथे पोर्णिमा,
चंदेरी धवल लख्ख,
तेच प्रेमाभाळ वाटे,
धूसर तममय मख्ख,–!!!
कुठे गेला माझा चंद्र,
आणि त्याचे प्रेमळ चांदणे,
विरहार्त गीत गाई,
पक्षी एकाकी दिवाणे,–!!!
चंद्र चांदण्या भरून बहरे,
खरे तर रात्र लोभसवाणी,
जशी ती जवळ येते,
आठवांनी काळीज चरे,–!!!
या रम्य निरव एकांती,
पुन्हा एकदा तू जवळ यावे, पहिल्यासारखे लाजलाजूनी,
कवेत माझ्या सामावून जावे,–!!
पुन्हा एकदा व्हावा तो, लाजराबुजरा शृंगार ,
नदीस जसा सागर भेटतो,
बघत राहावे त्यांचे उभार,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply