आज मन आनंदले,
सुखाच्याही पार गेले,
भंवसागरी तरणे खासे,
आता सोपे वाटले,–!!!
दुनियादारी निभावणे,
असते किती कठीण,
तरीही तावून-सुलाखणे,
सहजी कसे जमले,–!!!
मनमोर थुई थुई नाचे,
पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,–!
खंबीर,धीरगंभीर राहणे,
तटस्थभूमिका निभावावी,
येऊ देत वारे–वादळे,
मात्र एक झुंज द्यावी,–!
तुझ्यापेक्षा मी सरस,
म्हणत त्यांन भिडावे,
संकटांचे सतत घोर,
जिवामुळी लावू न घ्यावे
एक दत्तगुरु पाठीराखे,
राहावे निर्धास्त लेकराने,
गुरुमाऊलीच्या कुशीत सगळे,
आपुले दुःख सांगावे,–!!!
ते असतां मागे,
त्यांची जाणीव ठेवावी,
एक त्यांचे स्मरण,
सारी दुनिया विसरावी,–!!!
आनंदाच्याही डोही बुडावे,
ओलेत्याने राहावे कोरडे,
पाणी जाताना नाकी तोंडी,
दत्तगुरूंनीच फक्त वाचवावे,–!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply