सौ वैशाली जोशी या महिला उद्योजिकेची “भरारी .. वैशाली यांच्या इडलीची चव नागपुरातील मद्रासी समुदायात
इडलीसारखा दाक्षिणात्य पदार्थ, महाराष्ट्राच्या उपराजधानीतील एखाद्या कुटुंबाला जीवनाची व जगण्याची उभारीच नव्हे, तर भरारीही देऊ शकतो, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, मनीषनगर येथील वैशाली जोशी पूर्वीच्या वैशाली गडकरी यांच्या इडलीला आज, अर्ध्या नागपूरच्या चवीची ओळख मिळाली.
तीन वर्षांपूर्वी खासगी नोकरीत अकाउंटंट असणाऱ्या यजमानाची नोकरी सुटली. यानंतर स्वाभाविकपणे जगण्याची विवंचना समोर उभी राहिली. दोन मुले शिकणारी. मुलगी ९ वीत तर मुलगा ७ वीत होता. सरकारी नोकऱ्या तशाही मिळत नाहीत. खासगीत तर आणखी मारामार. परिणामी वस्तीतील ओळखीचे अण्णा यांनी ऑफर दिली. त्यांच्यासाठी इडलीचा व्यवसाय करण्याची.
सुरुवातीला इडली, दोसा, उत्तप्पे ,पांढरा ढोकळा यांचा तयार घोळ विकण्याचा व्यवसाय सुरू केला. लोकांना फोनवर ऑर्डर देण्याची विनंती करावी लागत होती. ‘फक्त एकदा खाऊन तर बघा’ या वाक्याने बघता बघता पाच वर्षांत, ‘मारली! वैशाली यांनी यजमानाच्या मदतीने, सासूबाईंच्या वाढदिवशी १३ जुलै रोजी ‘गजानन नाश्ता पॉइंट’ या नावाने, गजानन महाराज व सासू-सासऱ्यांच्या आशीर्वादाने या व्यवसायात उडी घेतली.
मंडळी, इडली म्हणजे काय तर एक प्रकारे तांदळाचा केक, त्यावर खोबऱ्याची चटणी आणि सांबार. पण ही झाली साधी सोप्पी पद्धत. ही पद्धत आपण स्वीकारायची नाही ताईनी आधीच ठरवलं होतं. त्यांनी आपल्या हॉटेल मध्ये वेगवेगळे प्रयोग केले.
या प्रयोगातून त्यांनी ग्राहकांना नेहमी पेक्षा वेगळ्या प्रकारःची इडली खाऊ घातली. आज त्यांच्या हॉटेल मध्ये ३० हून अधिक प्रकारच्या इडली चाखायला मिळतात.
त्यांच्या इडलीचे वैशिष्ट्य म्हणजे पांढऱ्या शुभ्र, मोठ्या आकाराच्या इडल्या तयार केल्या जातात. आज मनीषनगर येथील पुरुषोत्तम, कृष्णा यांसारख्या मोठमोठ्या दुकानांसह, अनेक छोटे-छोटे दुकान, हॉस्पिटल, खासगी पार्ट्या, वाढदिवस, सणवार, खासगी कार्यालये, एलआयसी कार्यालय इत्यादी ठिकाणी वैशाली या, इडलीच्या मोठ्या पुरवठादार बनल्या आहेत. वैशाली यांच्या इडल्या लहान मुलांपासून तर ज्येष्ठांच्या आरोग्याच्या साथीदार झाल्या आहेत.
संतोष द पाटील.
Leave a Reply