नवीन लेखन...

आजची ‘प्रतिज्ञा’

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत… परंतु…
मी माझ्या राजस्थानी बांधवांसारखा सुतारकामाचा, किराणा दुकानाचा किंवा मिठाईचा व्यवसाय करणार नाही.
(आज कित्येक राजस्थानी माणसं शहरात, खेड्यात अगदी डोंगरावरही किराणा मालाचे दुकान चालवतात. आख्खं कुटुंब घेऊन राहतात पण व्यवसाय यशस्वी करुन दाखवतात! त्यांची मिठाईच्या व्यवसायातही मक्तेदारी आहे. शहरात, उपनगरातही मिठाई घ्यायला गेलात, तर तेच भेटतील! घरचं, आॅफिसचं फर्निचर करायचं असेल तर कमी कालावधीत, रात्रंदिवस काम करुन, वाजवी मोबदला घेणारेही तेच आहेत.)
मी माझ्या गुजराती बांधवांसारखा शेअर्सचा, कपड्यांचा व्यवसाय करणार नाही.
(गुजराती माणसं कितीतरी राज्यात जाऊन कपड्यांचा व्यवसाय करतात. आज सूरतच्या साड्यांचं मार्केट त्यांचच आहे. स्वतःचा व्यवसायात जम बसल्यानंतर आपल्याच माणसाला भांडवल पुरवून त्यालाही हात देऊन वर काढण्यात, यांचा हात दुसरा कोणी धरु शकणार नाही. शेअर्ससारख्या बेभरवशाच्या व्यवसायात त्यांचीच मक्तेदारी आहे.)
मी माझ्या शीख बांधवांसारखा स्पेअरपार्टसचा किंवा वाहतुकीचा व्यवसाय करणार नाही.
(आज भारतात कुठेही जा. तुम्हाला वाहनांचे स्पेअर पार्टस घ्यायचे असतील तर या शीख लोकांचीच दुकानं आढळतील. हा त्यांचा व्यवसाय कित्येक वर्षांपासून चालू आहे. काही वर्षांपूर्वी वाहतूक म्हटलं की, ट्रकच डोळ्यांसमोर येत असे आणि हे ट्रक चालविणारे नव्याण्णव टक्के शीखच असायचे. अवजड वाहनांची रात्रंदिवस वाहतूक करणारे पंजाबी मी अनेकदा पाहिलेत.)
मी उडुपी बांधवांसारखा हाॅटेलचा व्यवसाय करणार नाही.
(आपण प्रवासासाठी कुठेही गेलो तर जेव्हा पोटात भुकेने कावळे ओरडू लागतात, तेव्हा कुठे उडप्याचं हाॅटेल दिसतंय का ते पाहू लागतो. त्याला कारणही तसंच आहे, उडुपीकडे शाकाहारी जेवण मिळतं. इडली, वडा सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा अशी विविधता त्यांच्याकडे असते. चहा देखील टिपिकल असतो. स्वच्छता असते. मद्रासपासून दिल्लीपर्यंत, गुजरातपासून कलकत्त्यापर्यंत कोठेही जा, तुमच्या सेवेला ‘उडुपी उपहार गृह’ सज्ज असतेच.)
मी माझ्या बिहारी बांधवांसारखी मोलमजुरी करणार नाही.
(आज कोणत्याही शहरात ड्रेनेज लाईनचे काम नगरपालिका काढते तेव्हा तिथे काम करणारे मजूर हे बिहारीच असतात. पोटापाण्यासाठी इतक्या लांब येऊन ते कष्टाची कामं करतात. कुठे आपत्कालीन परिस्थितीत डंपर चालविणारे, जखमींना ढिगाऱ्याखालून काढणारे हेच असतात. त्यांचं जीवनच कष्ट करण्यासाठी असतं)
मी माझ्या युपीच्या बांधवांसारखा दूधवाला भैय्याचा किंवा पानवाला भैय्याचा व्यवसाय करणार नाही.
(शहरात सकाळी उठल्यावर घराघरात दूधाचे रतीब घालणारा भय्याच असतो. पूर्वी चौकात एखादी भैय्याची पानांची टपरी असायची. आता पानवाला भैय्यादेखील आधुनिक झालाय. आता पानवाल्यांची मोठी पाॅश दुकाने दिसू लागलीत. मसाला पानांच्यामध्येही विविधता आली आहे.)
मी माझ्या आंध्रातल्या बांधवांसारखा बिड्या वळणे किंवा यंत्रमागाचा व्यवसाय करणार नाही.
(आंध्रमधील बहुतांशी घरांमधून बिड्या वळण्याचे काम केले जाते. अजूनही जुन्या पद्धतीने यंत्रमागावरती व्यवसाय केला जातो. शिवकाशीसारख्या ठिकाणी शोभेच्या दारूचे प्रसंगी जीवावर बेतणारे काम केले जाते.)
मी माझ्या बंगाली बांधवांसारखे हाॅटेलमध्ये वेटर्सचे काम करणार नाही.
(आज देशात कोणत्याही हाॅटेलात आपण गेलात तर आपल्या टेबलावर पाण्याचा ग्लास आणून देणारा वेटर हा बहुधा बंगालमधून आलेला असतो. दोन वेळच्या पोटाची भूक, त्याला परराज्यात जाऊन काम करायला भाग पाडते.)
मी माझ्या नेपाळी बांधवांसारखा वाॅचमनगिरी किंवा कुठेही रात्रभर गस्त घालणार नाही.
(पूर्वी शहरांमध्ये नेपाळी गुरखे दिसायचे. डोक्यावर तिरपी काळी टोपी, बारीक डोळे, खाकी ड्रेस, कमरेला कुकरी, हातात काठी अशा वेषात त्यांना पाहिलेलं आहे. सोसायटीतून कधी दिवाळीला पोस्त मागायला ते यायचे. आपलं गाव सोडून शहरात वाॅचमनचे काम करणारे हे नेपाळी आपल्या संरक्षणासाठी जीवावर उदार होतात.)
मी माझ्या केरळी बांधवांसारखा नारळपाणी किंवा पंक्चर काढण्याचा व्यवसाय करणार नाही.
(केरळी माणसं मुंबईतच नव्हे तर कुठेही नारळपाणीचा व्यवसाय करताना दिसतात. हा त्यांचा पारंपरीक व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे पंक्चर काढण्याची दुकानं त्यांचीच असतात. कोणत्याही राज्यात गेलात तरी पंक्चर काढायला हेच धावून येतील.)
मी माझ्या सिंधी बांधवांसारखा कोणताही व्यवसाय करणार नाही.
(सिंधी माणूस देशातच नव्हे तर परदेशातही ‘कोणताही’ व्यवसाय करु शकतो. त्यांचं गणितच वेगळं असतं. ते व्यावसायिक बुद्धीचे असतात, स्वतः कधीही तोट्यात जाऊ न देता ग्राहकाला आपण फायद्यातच आहोत, असा आभास निर्माण करणारे हे पक्के ‘बनिया’ असतात. मुंबईतील ‘उल्हासनगर’ ही त्यांची राजधानी आहे.)
थोडक्यात सारांश काय?
या सर्वांनी महाराष्ट्राला लुटलं असं आम्ही ओरडत राहणार पण त्यांच्याकडून काहीच शिकणार नाही…
आम्ही फक्त आमची वडिलोपार्जित जमीन गुंठा, गुंठा करुन विकणार आणि चारचाकी घेऊन चार टाळक्यांबरोबर ऐश करणार. वाढदिवसाचे मोठ्ठे फ्लेक्स बोर्ड झळकवणार. जयंतीनिमित्त मिरवणुका काढणार. अनुदान मागणार, मोर्चे काढणार आणि शेवटी आत्महत्या करुन ‘अमर’ होणार….
भारतात जन्मून जर न कराल कष्ट, एक दिवस नक्कीच व्हाल नष्ट!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२१-१०-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..