नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग तीन

बदलायचंय आपल्यालाच.
आपल्या पुढील पिढीसाठी!
शेवटी नवीन पिढी अनुकरण कोणाचे करणार ? त्यांचे आदर्श कोण असणार ?
आपणच ना !
मग आपल्यालाच बदलायला हवे.

सगळ्या व्यवस्था,
ही मानसिक गुलामगिरी,
भारतात हे असलं काही शक्यच नाही, ही नकारात्मक मानसिकता,
मीच का म्हणून बदलायचे, हा हट्टवादीपणा !
राज्यकर्त्यांची पराभूत वृत्ती,
हे सर्व आधी बदलायला हवं,
मी बदललो, तर माझं घर बदलू शकतं. माझं घर बदललं, तर शेजारी बदलू शकतो, एक शेजारी बदलवू शकलो, तर दुसरा तिसरा पण बदलतो. वाडी बदलते, गाव बदलतो, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रदेखील बदलायला फार वेळ लागणार नाही.

फक्त हवी सकारात्मक मानसिकता, लढण्याची वृत्ती आणि पूर्ण समर्पित भाव.
दुसरा नाही तर, मीच. असा विचार केला तर बदल नक्की लवकर होईल.

नवीन पिढीला देखील बदल हवाय ! फक्त सुरवात कुणीतरी करून द्यायला हवी.
आत्ताच्या स्वच्छता अभियानाचंच घ्याना, तरुण पिढीने हा विषय अगदी उचलून धरला आहे. अहो, साधा चाॅकलेटचा कागद देखील फोर व्हीलरमधून काच खाली करून बाहेर टाकू देत नाही. खिशात ठेवायला सांगतात. याचा अर्थ सकारात्मक भाषेत सांगितले तर तरुण पिढीला पण सर्वच गोष्टीत बदल हवाय.

अर्थात जो बदलायचं ठरवतो, तो नक्की बदलतो. अगदी आमूलाग्र. (आ मूलाग्र म्हणजे मुळापासून अग्रापर्यंत.) आणि जो बदलायचंच नाही असं ठरवतो, विनाकारण शंका घेत रहातो, तो कधीच बदलणार नाही. आणि हा बदल एका दिवसात दिसणार नाही. त्याला काळ हेच औषध आहे.

काळ सुद्धा बदलतोय, मग तुमची आमची सामान्यांची काय कथा. एक दिवस बदलणार नक्कीच !

अच्छे दिन आनेवाले है,
नही। आ रहे है ।

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..