आरोग्याचा विचार करता, भारताचा विचार करता, चिकित्सेची मुख्य पद्धत आयुर्वेद असायला हवी होती. पण आज भारताच्या या “अल्टीमेट” चिकित्सा पद्धतीला “अल्टरनेटीव्ह” ठरवली गेली. दुय्यम दर्जा दिला गेला.
वस्तुतः हिंदुस्थानात जेव्हा कापलेले नाक परत जोडण्याची शस्त्रक्रिया होत होती, तेव्हा अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष साध्या तापाने चुकीच्या औषधोपचाराचा बळी ठरला, हा इतिहास आहे.
आणि गंमत म्हणजे नाक जोडण्याची शस्त्रक्रिया (आजच्या भाषेतील प्लॅस्टीक सर्जरी ) कोण करीत होते ? तर भारतातील कुंभार !!! आणि हे त्रिवार सत्य आहे, कारण ही नोंद इंग्रजांच्याच आर्मीच्या एका मेडीकल ऑफीसरने स्वतःच्या दैनंदिनीमधे लिहून ठेवलेली आहे. ती डायरीदेखील उपलब्ध आहे. ती “ऑपरेशनची” प्रक्रिया खरंतर मुळातून वाचायला हवी.
याचा अर्थ कुंभार जातीच्या लोकांना देखील, त्यावेळी वैद्यकीय ज्ञान दिले जात होते.
तेव्हा गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात होते. सर्व जाती धर्माचे लोक आपल्या हिंदुस्थानामधे एकत्र गुरुकुलामधे राहून शिक्षण घेत होती. या गुरुकुलांमधे काय शिकवले जात होते, हे पण इंग्रजांच्या दैनंदिनी लेखनातून स्पष्ट होते. आणि हे पण स्पष्ट होते, की हिंदुस्थानचा खरा इतिहास आम्हाला कधी कळूच दिला नाही.
अशा अनेक खऱ्या गोष्टी विसरायला भाग पाडल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात चुकीचा इतिहास शिकवला जाऊ लागला.
काही वेळा कल्पनाविलास समजूया, पण आजही जी शस्त्रक्रिया जमू शकत नाही, ती शस्त्रक्रिया भारतीय पुराणामधे वर्णन केलेली आहे. श्री गणेशाचा “गजानन” कसा झाला ही गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे.
या ” ह्युमन हेड टू अॅनिमल हेड ट्रान्स्प्लांट” कथेला अनेक कंगोरे आहेत. ती कथा रूपक स्वरुपात कशी समजून घ्यायची असते, हे आफळेबुवांनी अतिशय छान शब्दात एका किर्तनात वर्णन केलेले आहे.
असो.
केवळ कल्पनेने तरी असे विचार आज आपण करू शकतो का ? यावर चिंतन मनन व्हावे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply