नवीन लेखन...

आजी आजोबांचा व्हॅलेंटाईन वीक”

एक होती साधीभोळी आजी ,
पण आजोबा होते कहर !
काहीतरी वेगळं करण्याची,
आजोबांना मध्येच आली लहर !!

“यावेळेस आपण करूया का गं,
प्रेमाचा आठवडा साजरा ?”
लाजत मुरडत हो म्हणत ,
आजीने लगेच माळला गजरा !!

“रोझ डे” चा गुलाबी दिवस ,
केला गोडाधोडाचा भडीमार !
एकमेकांना भरवला गुलकंद ,
मग रोझ सरबत थंडगार !!

हीरो प्रमाणे गुडघ्यावर बसून ,
आजोबांनी मागणी घातली आजीला !
“प्रपोज डे” साजरा करून गेले,
दोघं आठवडी बाजारात भाजीला !!

आता “चॉकलेट डे” ला काय द्यायचं ?,
म्हणून आजीने केला आटापिटा !
शेवटी ग्लास भरून दूध घेतलं ,
त्यात घातला भरपूर बोर्नविटा !!

“टेडी डे” ला आजोबांनी आणली,
छान अस्वलाच्या आकाराची उशी !
झोपेत दुखऱ्या मानेखाली ठेवताना,
आजीने आजोबांनाच मारली ढुशी !!

दिवसभर लवंगा चघळण्याची,
आजोबांना सवय होती फार !
“प्रॉमिस डे” ला आजीने दिल्या,
त्यांना प्रॉमिस टुथपेस्ट चार !!

म्हातार वयात काय हा चावटपणा ?,
असं म्हणत आजी बसली अडून !
“कीस डे” लाच झालं भांडण अन् ,
दिवस सरला शब्दांचा कीस पाडून !!

वाद मिटवायला आजोबांनी आणले,
आजीच्या आवडीचे खास बटाटेवडे !
अरेरे दुसऱ्या दिवशी पोट बिघडलं,
पार पडला मराठीतला “हग डे” !!

अखेर एकदाचा गाठला त्यांनी ,
“व्हॅलेंटाईन डे” चा अवघड टप्पा !
गरमागरम चहासोबत रंगल्या ,
राहिलेल्या बऱ्याच दिवसांच्या गप्पा !!

“जमायचं नाही बुवा आपल्याला,
असलं नाटकी प्रेम करणं !”
नुसता सोहळा करायच्या नादात ,
असं उगाचच्या उगाच झुरणं !!”

“प्रेमाचा फक्त एकंच दिवस ,
आपण म्हाताऱ्यांसाठी का असावा ? “
“प्रत्येक दिवस प्रत्येक श्वास ,
एकमेकांवर जीव लावून सोडावा !!”

सगळ्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा,
आपलं मनातलं प्रेमच बरं !
दिसलं नाही कुणालाच तरी,
एकमेकांवर असतं मात्र खरं !!

सगळ्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा,
आपलं मनातलं प्रेमच बरं
दिसलं नाही कुणालाच तरी,
एकमेकांवर असतं मात्र खरं !!

©️ क्षितिज दाते , ठाणे

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..