नवीन लेखन...

आजीवन साहचर्य म्हणजे विवाह

“Let me not to the marriage of true minds
Admit impediments
Love is not love which alters
When it an alteration finds” – William Shakespeare

विवाह हा खरा आणि आपुलकीच्या आधारावर बांधलेले असावा. पवित्र बायबलच्या मते विवाह म्हणजे आजीवन सहचर्य. देवाने सर्वप्रथम निर्माण केलेली संस्था म्हणजे विवाह होय. आदम(प्रथम पुरुष)ला निर्माण केल्यानंतर देवाच्या लक्षात आले की त्याच्या निर्मितीमध्ये काहीतरी कमतरता आहे. निसर्गामध्ये इतर पशु-पक्षी, वनस्पती अनेक गोष्टीही होत्या, पण त्यापैकी कुठल्याही आदमचे एकाकीपणा भरून काढण्यासाठी पूरक नव्हते. ती उणीव फक्त ईव्ह (प्रथम स्त्री) भरून काढण्यासाठी योग्य आहे असे देवाला वाटले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की पुरुष असो किंवा स्त्री दोघेही या निसर्गामध्ये एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. स्त्री आणि पुरुषामधील पवित्र संगम म्हणजे देवाच्या रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे.

समाजाने लग्नाचे महत्व आणि त्याच्या पावित्र्याचे खूप उदात्तीकरण केले असले तरीही आजच्या घडीला घटस्फोटाचे प्रमाण जलद गतीने वाढत चाललेले आहे. घटस्फोट ही तिरस्करणीय बाब आहे. कारण वैवाहिक जीवनामध्ये एकरूप झालेल्या दोन आत्म्यांच्या आत्मविश्वासाला क्षणार्धात मोडून टाकतो. बायबलमध्ये काही ठिकाणी घटस्फोटाचे समर्थन (काही परिस्थितींमध्ये) केले आहे. हे वगळता भरपूर ठिकाणी देवाला हि न आवडणारी गोष्ट आहे असाही उल्लेख आहे. बायबल असे सांगतो की, “विवाह बंधनात अडकलेले स्त्री आणि पुरुष हे दोन शरीर आणि एक आत्मा आहे”. बायबल व्यतिरिक्त इतर धर्मांमध्येही विवाहाबद्दल हीच संकल्पना मांडली आहे. उदाहरणार्थ हिंदू धर्मामधील शिवाचे ‘अर्धनारीनटेश्वर’ हे रूप होय. “म्हणूनच देवाने निर्माण केलेल्या या पवित्र बंधनातून वेगळे होऊ नका.” (मत्तय १९:६)

आजकालचे नाते-संबंध अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत. यातून घटस्फोटाला प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी प्रामुख्याने व्यभिचार, सुसंवादाचा अभाव, अवास्तवी अपेक्षा, समानतेचा अभाव, कौटुंबिक हिंसा, आर्थिक समस्या, राग, संताप, भावनिक जवळीकतेचे अभाव इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. याव्यतिरिक्त मानसिक आजार आणि हिंसक प्रवृत्ती घटस्फोटासाठी प्रवृत्त करते.

घटस्फोट हा माणसाला शारीरिक, मानसिक इतकेच नव्हे तर अध्यात्मिकदृष्टया उध्वस्त करून टाकतो. कुठलिही नाती टिकविण्यासाठी आयुष्य अपुरे पडते पण उध्वस्त करण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. गुंतागुंतीने भरलेले विवाह बंधन टिकविणे थोडे अवघड असते. हे एक प्रकारचे आव्हान म्हणावे लागेल. हे आव्हान धैर्याने आणि व्यवस्थितपणे पेलणे अत्यंत गरजेचे असते.

घटस्फोट पती-पत्नीचे मन, स्वास्थ्य या गोष्टींवर नकारात्मक परिणाम करतो आणि त्यातून नैराश्य, औदासिन्य आणि एक प्रकारची भीती दोघांच्या मनामध्ये निर्माण होत जाते. पती-पत्नीच्या व्यतिरिक्त घरातील मुलांवर सुद्धा याचा खोलवर परिणाम होऊ शकतो. अशा मुलांचे विवाह, जबाबदारी, बांधीलकी आणि प्रेम या गोष्टींवरचा विश्वास उडून जातो. याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक जीवन आणि मानसिकतेवर होतो. म्हणूनच आजची पिढी जबाबदाऱ्यांपासून पळून जाऊ पाहते आहे आणि मर्यादांच्या चौकटीतून मुक्त होऊ पाहते आहे.

आर्थिक स्वातंत्र्य, पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव, अमर्यादित स्वातंत्र्य आणि आभासी ध्येय किंवा उद्देश बाळगणे यासारख्या गोष्टी वैवाहिक जीवनामध्ये व्यत्यय निर्माण करतात.

काही वेळेस पालकसुद्धा त्यांच्या पाल्याला घटस्फोटासाठी प्रोत्साहन देतात. पण पालक या नात्याने आपल्या पाल्याला वैवाहिक जीवनाचे महत्व आणि घटस्फोटाचे वाईट परिणामांबद्दल जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे.

मग खूप लोकांना प्रश्न पडत असेल की, “मी माझ्या वैवाहिक संबंधाला घटस्फोटापासून कसे वाचवू शकतो/ते?”
जी लोक त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप अडचणींना सामोरे जात असतात ती नैराश्याच्या काठावर येऊन नाती तोडण्याच्या निर्णयाला येऊन पोहोचतात. ज्या प्रकारे आयुष्यात अडचणी येतात त्याचप्रकारे त्यावर उपायही आहेत. पण त्याकडे सजग दृष्टीने पाहणे अपेक्षित आहे.

सुसंवाद, वास्तविक अपेक्षा ठेवणे, अनुकुलनक्षमता बाळगणे, त्याग-तडजोड करणे, एकमेकांचे विश्वास कमविणे, पोषक संबंध वाढविणे, क्षमा करणे, दोघेही मिळून आर्थिक नियोजन करणे सागळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही हार न मानणे. या गोष्टी केल्या तर वैवाहिक जीवन संकटांच्या महापूरामध्येही ठामपणे उभे राहू शकते.
विवाह हे जीवनाच्या अग्रस्थानी असून पर्याय नाही.

वैवाहिक जीवन अगदीच सोपही नाही. यामध्ये भांडण आणि एकमेकांकडून चुका घडत असतातच. या परिस्थितींमध्ये ठाम राहून नात्याचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. परिस्थिती कुठलीही असो, पती-पत्नी दोघेही बिनशर्तपणे आपल्या प्रयत्नाने वैवाहिक संबंध शेवटच्या श्वासापर्यंत टिकविण्यासाठी संघर्ष करणे महत्वाचे आहे.

“ऋणानुबंध-रूपेण पशु-पत्नी-सुतालयाः।
ऋणक्षये क्षयन्ति तत्र का परिवेदना॥” ( पद्मपुराण )

लेखिका- डॉ. एनी जॉन
मराठी अनुवाद: प्रा. कमलाकर रुगे

विशेष आभार : रजनीश जोशी सर

— कमलाकर रुगे 

Avatar
About कमलाकर रुगे 6 Articles
मी सध्या इंग्रजी प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. आतापर्यंत माझे लेख दिव्य मराठी मध्ये प्रकाशित झालेले आहेत. मी ब्लॉग वर माझे लेख प्रकाशित करीत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..