नवीन लेखन...

आखिर क्यूँ?

” वीर-जारा ” मध्ये शाहरुख खान किरण खेरला म्हणतो- “माहित नाही, माझ्या आणि तुमच्या देशातील मुले सारखीच असतात का ते? पण एवढं मात्र खात्रीने सांगू शकतो – आई इथून-तिथून सारखीच असते.”

नव्याने झालेले किंवा इन जनरलातच आजी -आजोबा आपल्या नातवंडांवर एकसारखेच प्रेम करीत असतात, त्यांचे लाड करीत असतात. तेथे त्या आजी-आजोबांची जात-पात, धर्म, वर्ण मध्ये येत नाही. त्यांच्या प्रेमाची श्रेणी एकच असते.

क्वचित पणजोबा-पणजी होण्याचे भाग्य वाट्याला आले तर काही विचारूच नका. दुधावरच्या साईचे ते पुढील लोणी/क्रीम/तूप वगैरे वगैरे सगळे असते. फक्त आणि फक्त प्रेम !

थोडक्यात काय तर सगळ्या आया, सगळे वडील————— ” आतून” सारखेच असतात.

मग बाह्यतः भेदाभेद, विविधता, सर्वसमावेशकता, सामाजिक न्याय या साऱ्या शब्दांना आपण “न्याय” देतो का? आपल्यावर ज्या घटनांचे प्रत्यक्ष प्रभाव पडत नाहीत, त्यांच्याही बाबतीत आपण नको तितके संवेदनशील का असतो?

प्रत्येक व्यक्तीचा आतला थर विरोधी मतांचाही आदर,सहृदयता, कणव असा कां असू नये? लगेच विरोधवादाच्या तलवारी उपसल्या जातात आजकाल !
गेले काही महिने दोन देशांचा प्रत्यक्ष युद्धज्वर आपण बघतोय, ऐकतोय. त्याची अप्रत्यक्ष झळही आपल्याला बसतेय. तरीही क्षुल्लक वादांच्या सावल्यांमधून आपण बाहेर पडत नाहीत.

सर्वोत्कृष्ट खेळाडूलाही एका कोचची /प्रशिक्षकाची/मार्गदर्शकाची आवश्यकता असते. मग प्रयत्नपूर्वक दुभंगाकडे निघालेल्या समाजपुरुषाला आता संत/सद्गुरू नामक पथदर्शकाची उणीव भासत नसेल का? आसपास अकारण-सकारण टोळीयुद्ध सुरु असते, त्याचाही कधी-कधी उबग येतो. पटेल इतकी टीकाटिपण्णी जरूर असावी पण त्याचे ओरखडे उठू नयेत. द्वेषमूलक विधाने टाळली जावीत आणि शांतपणे श्रवण करण्याचा (ऐकून घेण्याचा) सराव सर्वांनी वाढवावा.
सुरुवातीला लिहिलंय तसे- आपण “आतून” इतके एकसारखे असतो तर हा बाह्य, अमंगळ भेदाभेद का?

काही सुधारणा होण्याची, बदलाची प्रतीक्षा करण्याचाही आता हळूहळू कंटाळा येत चालला आहे.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..