आला, आला, आला,— $$$$बघा, बाप्पू चिवडेवाला,—-,
या मुलांनो, या तायांनो,
या दादांनो,या बायांनो,
या मित्रांनो, या बाप्यांनो,
लवकर सगळे, पटपट या,
आला,आला,आला,
बाप्पू चिवडेवा$$$$ला,$$$ —-
माझ्या चिवड्याची गंमत न्यारी,
लई, लई लज्जतदार,
खुमारी””’ही भारी,—!!!
तळलेले शेंगदाणे, अन्
खोबऱ्याचा चुरा,—-!!!
आला, आला,आला,—
तिखट नाही, तेलकट नाही,
आहे कसा खुसखुशीत,
तोंडात जरा टाकून पहा,
जीभ होईल रसरशीत,
सुटेल तोंडाला पाणी,
मग मागाल आणखी थोडा,
आला, आला, आला,—
बघा बाप्पू चिवडेवाला,—-
मस्त, मसालेदार, चविष्ट,
खूष’ होणार, कोणी रूष्ट’,
फार महाग नाही हो,—
दहाला छोटा पुडा,—-!!!
आला, आला, आला,—!!!
रूपये दहा काढा बंदे,
सोडुन धावा सगळे धंदे,
याच्यापुढे ‘गारद’ सर्व खंदे,
थोडासा, खाऊन बघा आजोबा,
आला,आला, आला,$$$$
अशी मारल्ये त्याला,
खमंग खमंग फोडणी,
हिरव्या मिरच्यांची चुरी,
त्यात कोथिंबीरीचीही हजेरी,
लसणाची, खास चटक पेरणी,
काजूही आत खूप,—
मारा की हो फक्का,—!!!!
आंबट—गोड चवीची मस्ती,
अशी आगळी’ चवच नसती,
दहा रूपयांत भरपूर, बघा,–
यां, ना यां, –पोटाला खा, —!!!
आला, आला, आला,–!!!
जेथे जाईन तेथे,
ग्राहक आपले सगळे,
गडी, कामगार, नेते,
आपुल्या चिवड्याचे चाहते,””
बाप्पूला ओळखे,–
हरेक वस्तीवाला,—!!!!
आला, आला, आला,—
घ्याल तेवढा कमीच पडे,
पुन्हा पुन्हा, जो तो मागे,
आज रोख अन् उद्या उधार,
एवढेच लक्षात ठेवा,—
आला, आला, आला,—
ऐकून माझी आरोळी,
धावतात की हो सगळी,
नुसत्या मारता मिटक्यां,
पटापट आता पैसे काढा,
आला, आला, आला,—!!!
ताई, माई,आक्का,–
दुसरीकडून घेऊ नक्का,
क्षणार्धात माझ्या चिवड्याचा,
पाडाल बघा, कसा फडशां,
आला, आला, आला,
बघा बाप्पू चिवडेवाला,—$$$$
बाप्पू चि$$$$ वडेवाला,—!!!
© हिमगौरी कर्वे ७७७ ५०८५६५७.
Leave a Reply