आमची *राजहंसी जोडी, फिरते मस्त या तलावी,
डौलदार माझा राजा,
लोक आम्हा पाहत राहती,–!!
सौंदर्य आमुचे राजसबाळे,
मुखडे तर किती देखणे,
आम्हा पाहण्या होड चाले,
नेहमीच या तलावाकाठी,–!!!
डुबुक डुबुक पाण्यामध्ये,
आम्ही विहरतो शानदार,
रंग शुभ्र लोभसवाणे
आकर्षित लोक इथे फार,–!!!
पर’ फैलावीत, सूर मारत,
सुळकन् पाण्यात जातो दिमाखदार जोड पाहुनी,
कुणी प्रवासी थक्क होतो,–!!!
लाटांच्या सिंहासनीकसे
झोकदार,आम्ही बसतो, वरखाली हालती त्या,
किती ऐटदार बघा दिसतो,–!!!
आम्हां न लागते रंगरंगोटी,
तुम्हा नकली माणसांगत,
नैसर्गिक सौंदर्य आमचे,
कित्येक वाखाणती अव्याहत,–!!!
अप्राप्यही लौकीकाला, स्वर्गीय आमची जात,
राजबिंडे लावण्य का,
कधी येते सामान्यात,–!!!
तेजस्वी आमची काया,
पाहण्यास खूप तरसती,
कुणास ठाऊक किती आम्हा,
कसे केव्हा पाण्यात पाहती,-!?
पाण्यातील प्रतिमा आम्हा,
उगाच पहा खुणावतसे,
वाटून खालील दोघांचा हेवा,
मन आंत डचमळतसे*,—!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply