नवीन लेखन...

आमचा कट्टा

अस्सा आमचा कट्टा बाई, अस्सा आमचा कट्टा
मिळून सार्‍याजणी करतो, गप्पा थट्टा ।।
अस्सा आमचा कट्टा

कोण म्हणतो ग्रूप करावा, फक्त तरुणांनी
आम्ही देखील करू शकतो, आमचि मनमानी
भेदभाव नाही येते, छोटा आणि मोठा,
अस्सा आमचा कट्टा

रोजचा नाष्टा वेगळा, अन् रोजचा बेत वेगळा
पावभाजी शेव चिवडा, शिरा चकली वडा
लोणची, संत्री केळ्यांचाही, होता चट्टामट्टा
अस्सा आमचा कट्टा

सणवार वाढदिवस, येतात वेळोवेळी
कुणी वाटे चॉकलेट, तर कुणी देई गोळी
कधी मधी हाती येतो, प्रसादाचा पेढा
अस्सा आमचा कठडा

सांधेदुखी पाठदुखी, यांची हकालपट्टी
हृद्रोग, मधुमेह सार्‍यांची करतो आम्ही छुट्टी
साखर, तेल, तूप, डाळ, जमते आमची गट्टी
नको नको म्हणत जी ती, घेते अअपल्या वाटा
अस्सा आमवा कट्टा

पुस्तक डबे पैसे पिशवी, चाले देव घेव
अमकी म्हणे तमकीकडे माझा डबा ठेव
कुणी कुणाला घेई चिमटा, पाठीत एक धपाटा
अस्सा आमचा कट्टा

कुणी घरची राणी, तर कुणी करूण कहाणी
एकीसाठी दुसरीच्या डोळ्यामध्ये पाणी
सुखदु:खाचा चाले येथे अस्सा रोड बटवडा
अस्सा आमचा कट्टा

घटकाभर सार्‍याजणी विसरून जातो वय
नंतर येते जिला तिला आपल्या घरची सय
पत्नी, आई, सासू-आजी, लेवून एक मुखवटा
प्रत्येकीच्या होती पुन्हा, वेगवेगळ्या वाटा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..