” आंधी” चित्रपट भारतभर व मुंबईत मेट्रो थिएटरमध्ये गर्दीत सुरु असतानाच देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर झाली, त्यात या चित्रपटांवर बंदी आणली गेली. हा बहुचर्चित चित्रपट काही महिन्यांनी पुन्हा सेन्सॉर करण्यात आला आणि मग पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. संजीव कुमार व सुचित्रा सेन यांचे यातील काम अप्रतिम. कोशीश आणि आंधी सारखे खास चित्रपट गुलझार यांनी संजीव कुमार यांना करण्यास दिले, आणि दोन्ही चित्रपटा साठी संजीव कुमार यांनी बेस्ट कलाकाराची बक्षीसे मिळवली. आंधी हा चित्रपट म्हणून तर अप्रतिम आहेच पण यात आहेत आर डी बर्मन यांची गाणी. ” आंधी ” चित्रपट म्हणजे राजकारणाच्या पाश्वभूमीवरील संवेदनशील प्रेम कथा. इंदिरा गांधीच्या आयुष्याशी असलेल्या काहीशा साधर्म्यामुळे ह्यावर काही काळ बंदी घालण्यात आली होती. जे के (संजीव कुमार) हा हॉटेल मॅनेजर असतो, त्याच्या प्रेमात आरती (सुचित्रा सेन) ही एका राजकीय पुढाऱ्याची मुलगी पडते. लग्नानंतर काही वर्षांनी काही अपरिहार्य कारणांमुळे आरती राजकारणात प्रवेश करते. कालांतरानं आरतीची आरती देवी होते. जे के आणि आरती देवी दोघं एकमेकांपासून वेगळे होतात. अनेक वर्षांनी पुन्हा दोघे एकमेकांना भेटतात तेव्हा दोघांना जाणवतं की एकमेकांवरचं प्रेम अजूनही तेवढंच आहे. आयुष्यातील ध्येयाला मिळविण्यासाठी नायिकेने कठोर निर्णय घेतलेला असतो पण पतीशी भेट झाल्यानंतर स्वतःच्या भावनांना ती आवर घालू शकत नाही. त्यानंतर पतीच्या अस्तित्वामुळे तिच्या आयुष्यात येणारे वादळ.
या चित्रपटातील गाणी जशी अप्रतिम तसेच संवाद देखील थेट हृदयाला भिडणारे आहेत. गाणी, संवाद या बरोबर संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांचा अभिनयही अवर्णनीय! काही प्रसंगांचे चित्रीकरण कायमचे लक्षात राहणारे. भेटीनंतर पतीच्या घरात शिरतानाची तिची भिरभिरती नजर. ही नजर आपणास बरेच काही सांगून जाते. माझ्याशिवाय हा कस् आयुष्य जगतोय, ह्याच ठीक चाललंय ना, एक नजर बरेच काही सांगून जाते. संवाद ही कसे, एकाच वाक्यातून जीवनातील अर्थही सांगून जाणारे. दिर्घ काळानंतरच्या पहिल्याच भेटीत तो म्हणतो ‘थोडा पतला हो गया हुं’. मी शरीराने तर खचलोच पण मानसिक दृष्ट्या (तुझा सहवास नसल्याने) कमजोर बनलो आहे. एका प्रसंगात नायिका म्हणते. तुम्हारी साथ कविता न होती तो तुम सामान्य होते.
ह्या चित्रपटातील ३ गाणी मंत्रमुग्ध करून टाकतात.
https://www.youtube.com/watch?v=9ezj1yuRmIc
१) तुम आ गये हो नूर आ गया हैं
२) इस मोड से जाते हैं
३) तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं
https://www.youtube.com/watch?v=wBYMGrThxkI
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply