माझ्या घरी टीव्ही आला..
आणि मी पुस्तकं वाचायचं विसरलो !
माझ्याकडे गाडी आली..
आणि मी चालायचं विसरलो !
माझ्याकडे एअरकंडिशनर आला..
आणि मी झाडाखाली बसून गार हवा खायचं विसरलो !
मी शहरात रहायला आलो..
आणि गावाकडच्या चिखल-मातीला विसरलो !
माझ्याकडे क्रेडिट – डेबिट कार्ड आलं..
आणि मी पैशाची किंमत विसरलो !
माझ्याकडे परफ्यूम आला..
आणि मी फुलांचा सुगंध विसरलो !
मी फास्ट फूड – जंक फूडची चव घेतली..
आणि वरण-भात खायचंच विसरलो !
माझ्या हातात मोबाईल आला..
आणि मी पत्र लिहायचं विसरलो !
माझ्याकडे कॉम्प्युटर आला..
आणि मी व्याकरण आणि स्पेलिंग विसरलो !
माझ्याकडे व्हॉटस-अॅप आलं..
आणि मी गप्पा मारण्यातली मजाच विसरलो !
जगण्यातल्या रोजच्या धावपळीत..
मी……… विश्रांती घ्यायलाच विसरलो !
— निनाद प्रधान
Leave a Reply