शेवटी साथ जर पाहिजे
माणसांची कदर पाहिजे
तूच असशील ज्याच्यामधे
स्वप्न ते रात्रभर पाहिजे
जीव तर लावतो गाव पण
माणसाला शहर पाहिजे
कर्जमाफी नको उद्धवा
शेतमालास दर पाहिजे
जीव होईल वेडापिसा
फक्त पडली नजर पाहिजे
फक्त एका क्षणाची नको
साथ आयुष्यभर पाहिजे
तू असे चुंब की आठवण
राहिली जन्मभर पाहिजे
काल होता हवा पायथा
आज त्याला शिखर पाहिजे
जी हवी ती दवा दे मला
व्हायला बस् असर पाहिजे
भोवती लाख असतात पण
आपला एकतर पाहिजे
– महेश मोरे (स्वच्छंदी)
9579081342
Leave a Reply