आरक्त नयनी ओढ तुझी
धुंद बावरी मी आतुर मिलनी,
ये तू सख्या साद हलकेच माझी
मोह तुझ्या मिठीचा मधुर मलमली..
गात्र सैलावली रोमांचित होउनी
स्पर्श माझा होता मोहक मखमली,
मुग्ध होशील तू सख्या हलकेच
ती कातर वेळ धुंद मनोमिलनी..
कितीक वाट पहावी तुझी
तुझ्यात आर्त व्याकुळ मी,
ओठ ओठांना भिडता अलवार
मधुर चुंबीता तू ओल्या हळव्या देही..
सोडते लाज मी स्पर्श होता तुझा देही
तू ओढून घे मिठीत त्या कातर क्षणी,
मलमली मिठीत माझ्या तू ये बेधुंद मनी
विरघळून जा सख्या माझ्यात अबोल अंतरी..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply