दंतमंजनाविषयी मागे बराच उहापोह झालेला असल्याने आता पुनः भारतीय दंतमंजनाविषयी लिहीत नाही.
प्रत्येक कृतीमधे आपण भारतीयत्वापासून कसे लांब जातोय, आणि भारतीयत्वापासून लांब जाणे म्हणजे आरोग्यापासून लांब जाणे, कारण भारतीयत्व म्हणजे संपूर्ण आरोग्य हे लक्षात आणून देणारी ही लेखमाला आहे, याची एकदा आठवण करून देतो. आपण भारतीय असल्याचा आनंद नक्कीच व्हायला हवा. गेले ते दिन गेले, असे म्हणून सोडून देऊन कसे चालेल ? त्यातील जे चांगले असेल ते स्विकारण्याची तयारी हवीच.
११. करदर्शन आणि भूमीवंदना
१२. ईश्वराची खरी ओळख
१३. सगुण ईश्वराची प्रार्थना.
१४. दंतमंजन करण्याअगोदर चुळ न भरता पाणी पिणे.
हे सर्वथा चुकीचे आहे. वाग्भट या ग्रंथात चुळ न भरता पाणी पिण्याचा उल्लेख देखील नाही.
आपल्या भारतीय परंपरेत देखील असा उल्लेख नाही. किंवा कोणत्याही कुळपरंपरेमधे देखील सकाळी उठल्यावर चूळ न भरता पाणी प्यावे असे सांगितलेले नाही.
हे प्रक्षिप्त असावे. (प्रक्षिप्त म्हणजे मुळात नसलेले आणि मागाहून घुसडलेले. )
रिकाम्या पोटी चुळ न भरता पाणी पिल्याने लाळेतील विशिष्ट रसायने पोटात जातात, जी पचनाला मदत करणारी असतात, असे जे सांगितले जाते, त्याला भारतीय आधार नाही.
सकाळी उठून पहिली गोष्ट मलविसर्जन करणे. त्यानंतर तोंड हात पाय धुणे. नंतर लगेचच दंतमंजन करणे. इथे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात कसे येणार ?
आज्जी ओरडायची, “दात घासल्याशिवाय इकडे तिकडे फिरत राहू नकोस. आधी पहिल्यांदा दात घास.”
“दात घासल्याशिवाय बोलू पण नकोस” असे ओरडणारी आमची आई, दात घासायच्या अगोदर पाणी प्यायला परवानगी कशी देईल. ?
एकंदरीत आठवणीत असलेल्या दोन तीन पिढ्यांना एखादी प्राचीन परंपरा माहिती नसणे, असे शक्यच होणार नाही.
पण एखादी चुकीची गोष्ट वारंवार सांगितली गेली की, ती खरी वाटायला लागते, या मानसशास्त्रातील नियमानुसार काही चुकीच्या गोष्टींचा समावेश आपल्या संस्कृतीमधे होऊ पहातोय. त्यातील ही एक चुकीची संकल्पना, दात न घासता पाणी पिणे. !
भारतातील नाही तर ही पद्धत आली कुठुन ?
भारताबाहेरून. !
पाश्चिमात्य संस्कृती आत्ता आपल्याला झगमगीत दिसते आहे, पण एक काळ असा होता, की नीती, सभ्यता, सुसंस्कृतपणा, म्हणजे काय हे त्यांना माहित देखील नव्हते. लूटमारी करण्याच्या निमित्ताने ही मंडळी जेव्हा त्यांचे देश सोडून इतर देशात फिरायला लागली, तेव्हा त्यांना भारतीय सिव्हीलाईज्ड सोसायटीची तोंडओळख व्हायला सुरवात झाली. नंतर मात्र त्यांनी शिकायला सुरवात केली. आणि प्रत्येक गोष्ट आत्मसात करायला सुरवात केली. वेदांचा अभ्यास, गणिताचा अभ्यास, खगोलशास्त्राचा अभ्यास, नौकानयनाचा अभ्यास, धातुशास्त्राचा अभ्यास, भोजनशास्त्राचा अभ्यास अशा अनेक चौदा विद्या चौसष्ट कलांचा अभ्यास सुरू केला.
आपल्याकडील एका आरतीमधे दैत्यांनी वेद चोरून नेल्याचा उल्लेख मिळतो. हे दैत्य परदेशातून आलेले होते. कारण ‘चोरी करणे हे पाप आहे’ हे ज्या संस्कृतीत शिकवले गेले, त्या संस्कृतीत वेदांची आणि विद्येची चोरी होऊच शकणार नाही.
पण स्वतःला ‘सिव्हीलाईज्ड’ बनवण्यासाठी या दैत्यांनी वेद चोरून नेले. मग भगवान विष्णुंना दैत्यांबरोबर युद्ध करून ते वेद पुनः ब्रह्मदेवांना आणून द्यावे लागले. या दंत कथा नाहीत, हे भारतामधे आलेल्या पाश्चात्य अभ्यासक पर्यटकांनी लिहून ठेवलेल्या नोंदीत आढळते. (डाॅ. प.वि.वर्तक यांनी लिहिलेली श्रीराम, श्रीकृष्ण ही पुस्तके जरूर वाचावीत.)
एवढ्या सुसंस्कृत सभ्यता असलेल्या समाजाला किंवा समाज व्यवस्थेला रामराज्य अशी उपाधी होती. असो.
पाश्चात्य लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करू लागले, स्वतःला सुधरवू लागले. सुसंस्कृत होऊ लागले, हा इतिहास आहे.
पण आम्ही बिघडत चाललो हे वर्तमान आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply