३१ धूमपान करणे हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, हे फक्त आपली संस्कृती सांगते. अर्थात त्यात मद निर्माण करणारा तंबाखू नको, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि नीट लक्ष ठेवून वाचा. धुमपान असं लिहिलं आहे. धुम्रपान नाही. दैनंदिन धुमपान, प्रासंगिक धुमपान, चिकित्सास्वरूप धुमपान असे प्रकारही वर्णन केलेले आहेत. हे धुमपान प्रदूषण वाढवण्यासाठी नसून रोग कमी करण्यासाठी होते.
होते असे भूतकालीन रूप, आत्ता वापरावे लागते, कारण आत्ता त्यातील दैनंदिन स्वरूपात करायचे धुमपान बंद झाले आहे.
गुडगुडी, हुक्का हे प्रकारदेखील पूर्वी होते, राजेमंडळी वापरायची, पण राजमान्यता नव्हती. ? ?
नियंत्रितपणे औषधी वनस्पतींचा वापर करून, नियंत्रितपणे निर्माण केलेल्या धुरामुळे वातावरण शुद्ध रहाते, म्हणून तर फक्त आपल्याकडेच धूर निर्माण करण्यासाठी निरांजन लावणे, धूप दाखवणे, कापूर जाळणे, दृष्ट काढणे, यज्ञ करणे, इ. प्रकार नित्य नियमाने होत होते. या सर्व प्रकारांची सविस्तर माहिती आरोग्यरहस्य भाग एक या पुस्तकामधे आलेली आहे.
३२. अभ्यंग म्हणजे तेल लावणे. नित्यपणे आचरणात आणावे, स्वतःची रोग प्रतिकार शक्ती वाढवून रक्तदाबादि अनेक रोगांना दूर ठेवते.
आणि दीपावलीच्या निमित्ताने त्याचे प्रात्यक्षिक करून दरवर्षी हे अभ्यंग स्नान पुढच्या पिढीसाठी ‘अपडेट’ करणे हे कोणत्या संस्कृती मधे आहे ?
फक्त आणि फक्त, भारतीय संस्कृतीमधेच आहे. याचा मला भारतीय म्हणून सार्थ अभिमान आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply