३३. एका जागी बसून दात घासण्याची परंपरा विसरून फिरत फिरत दात घासायला लागलो.
३४.अंथरुणात, गादीवर, बेडवर बसून, काही खायचे नसते, ही भारतीय परंपरा विसरलो.
३५. आंघोळ झाल्याशिवाय खायचे सोडाच, स्वयंपाकघरात जायचे सुद्धा नाही, ही आदर्श पद्धत विसरत चाललो.
३६. दात तोंड स्वच्छ केल्यावर चेहरा पुसण्यासाठी आपला स्वतंत्र नॅपकीन न घेता, बेसिनवरचा सार्वजनिक टाॅवेल वापरू लागलो. त्यामुळेच साथीचे रोग पसरायला शहरी भागात मदत होते. पण गावामधे मात्र स्वतःचा टाॅवेल स्वतःच्या खांद्यावर, डोक्यावर, कंबरेला गुंडाळून काम सुरु असते.
३७. गरजा कमी होत्या. आज गरजा वाढवल्यामुळे रोगही वाढले आहेत.
३८. सकाळी उठल्यावर गरम दुध किंवा धने जिरे पाण्याऐवजी काळा चहा पिऊ लागलो.
घरी आलेल्या पाहुण्यांना चहा, काॅफी विचारणे ही पाश्चात्यांची देणगी आहे. आपली पद्धत गुळ पाणी देण्याची होती.
३९. केवळ चहावर भागेनासे झाले, तेव्हा त्याच्यात बुचकळायला बिस्किटे, पाव, बटर, खारी, मारी यांची गरज भासू लागली.
४०. बटर बिस्कीट बनवण्यासाठी मैद्याचा वापर सुरू झाला.
४१. उन्हातून आल्यावर आंबट गोड औषधी सरबत, पन्हे इ. देण्याऐवजी विषारी पेप्सी कोकच्या बाटल्या उघडू लागलो.
४२. घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी, पगडी, मुंडासे, फेटा इ. बांधण्याची पद्धत मुळात भारतीयच होती. डोके गुंडाळून किंवा मस्तक झाकून घराबाहेर जाणे हा शिष्टाचार समजला जात होता.
४३. घरातून बाहेर पडताना शुचिर्भूत होऊनच बाहेर पडावे, बाहेरून आल्यावर पुनः आंघोळ करावी. निदान अंगावरचे कपडे त्वरीत बदलावेत, किंवा निदान हातपाय तोंड धुवावे, हे सर्व आरोग्य रक्षण होण्यासाठीच होते.
वाढती आधुनिकता आणि पाश्चात्य शिष्टाचाराची बदलती पद्धत यांचा आमच्यावर एवढा परिणाम झाला आहे की आपण आपल्या या मूळ भारतीय सवयी बदलल्या. या सवयी बदलल्यामुळे आरोग्य हरवत चालले.
जिथे हरवले आहे तिथे जोपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत काही मिळत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply