४५.सकाळी ऊठून दंड जोर बैठका मारून, मुद्गल फिरून, दंडाच्या बेटकुळ्या हलवून दाखवणारी आमची पिढी आणि पोटावर सिक्स पॅक दाखवणारी आजची पिढी.
केवळ पोटावर चार सहा बिस्किटे दाखवता आली म्हणजे पूर्ण आरोग्य मिळत नसते, जिममधला व्यायाम हा हट्टी व्यायाम प्रकार आहे. विशिष्ट स्नायुंची ताकद विशिष्ट व्यायाम करून वाढवता येते, पण त्याचा परिणाम इतर मांसपेशीवर वा अन्य नाजूक अवयवावर होतो, हे पण लक्षात घेतले जात नाही.
४६. नियमितपणे व्यायाम केला पाहिजे हे समजून सूर्यनमस्कारासारखा शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक बल वाढवणारा सर्वांग सुंदर व्यायाम करीत, दिवसाची सुरवात करणारी एक पिढी आणि पाश्चात्य वैद्यकाला भुलुन व्यायामाच्या नावाखाली, सकाळी सकाळी दव पडत असताना, थंडगार हवेत फिरून, वाताचे आजार वाढवून घेणारी, आजची पिढी. “माॅरनिंग वाॅक” हा अभारतीय प्रकार आहे, केवळ चालणे हाच उत्तम व्यायाम असे मानणाऱ्या विचारांना यापेक्षा दुसरे भारतीय व्यायाम प्रकार आणि त्यातील विज्ञान माहिती नसणाऱ्या मंडळीसाठी तो ठीक होता.
४७. आंघोळ झाल्यावर तुळशीला प्रदक्षिणा घालून, औषधी गुणाच्या तुळशीचे पान घातलेले पाणी, तीर्थ म्हणून पिणारी एक पिढी. आणि तीर्थ वगैरे काही नसते, साधे ‘एचटुओचं’ असते, असं काहीतरी सिद्ध करू पहाणारी आजची पिढी.
४८. शंखामधे पूजेच्या वेळी पाणी भरून ठेवून दुसरे दिवशी हे शंखोदक पिऊन आपली कॅल्शियम सारख्या खनिजाची कमतरता आपोआप भरून काढणारी एक पिढी. आणि प्रत्येक वेळी रोग झाल्याचा परिणाम म्हणून शरीराचा तात्पुरत्या स्वरुपात बिघडलेला तोल सांभाळण्यासाठी, रसायनांचा धोकेदायक वापर करणारी आजची बिनधास्त पिढी.
४९. आपला आहार सुसंतुलित ठेवून, पचनासाठी पुरेसा वेळ देऊन, त्यातूनच पोषणासाठी आवश्यक असलेली अठरा मूलद्रव्ये कशी मिळतील, आणि शरीरातच ती कायम स्वरूपी कशी तयार होत रहातील हे सांगणारे भारतीय आहार शास्त्र व्यवहार्य बनवणारी एक पिढी आणि जेवण बनवताना आणि जेवतानादेखील वजन काटा घेऊन बसावे लागते की काय असे वाटणारी पाश्चात्य डाएटीशियन तंत्राला भुललेली आजची स्मार्ट पिढी !
५०. प्रत्येकाची गरज आणि प्रत्येकाची पचनशक्ती म्हणजे भूक लक्षात घेऊन, आहाराचे नियम ठरवणारी एक पिढी आणि आहाराचे चाकोरीबद्ध नियम करून नियमाच्या चौकटीत राहून, पाश्चात्य आहारशास्त्राचे चार्ट पाळत बसणारी आजची पिढी.
पूर्णतः भारतीय पद्धतीचा, जीवनशैलीचा नीट अभ्यास केला तर अनेक गोष्टी सोप्या होऊन जातील, पण जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी खूप मोठा “स्ट्रगल” करावाच लागतो, म्हणून काहीबाही करणारी आजची पिढी.
किती ठिकाणी बदलायला हवंय !?
लक्षात येतंय का ?
२५ फेब्रुवारी २०१८
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply