आषाढ मासातील चतुर्दशीला कोकिळा व्रत केले जाते. या वर्षी कोकिळा व्रत २३ जुलै २०२१ रोजी कोकिळा व्रतास सुरुवात होत आहे असून, २२ ऑगस्ट २०२१ (नारळी पौर्णिमा) पर्यंत हे चालेल.
या काळात घराच्या प्रांगणात किंवा डब्यात आंब्याचे रोप लावावे. त्यानंतर चांदी, सोने, धातू किंवा लाख याप्रकारातील कोणतीही कोकिळेची मूर्ती झाडावर बसलेल्या स्वरूपात स्थापन करावी.मंत्रोच्चारात पूजा करावी. वास्तू पूजे प्रमाणेही पूजा करण्यात येते. १, ५, ११, २१ जोडप्यांना भोजन देऊन सुवासिनींची ओटी भरावी. साडी, चोळी, बांगड्या, पोत, फळ, कुंकवाचा करंडा, जोडवे, अलंकारांचाही समावेश करावा.
असे करता येते व्रत.
कोकिळेचा आवाज ऐकणे चांगले असते. प्रत्येक जण आपापल्या परीने व्रत करीत असते. निज आषाढ पौर्णिमेला व्रत सुरू होऊन श्रावण शुद्ध पौर्णिमेला समाप्ती होते. एका वेळेला भोजन करून, जमिनीवर झोपून, कोकिळेचे शब्द ऐकून, महिनाभर उपवास करणे, यापैकी कोणत्याही पर्यायाने हे व्रत केले जाते; परंतु तसे जमल्यास शेवटचे सात, तीन, एक दिवस हे व्रत केल्यास चालते.
सौभाग्याचे हे व्रत असून चतुर्मासात ज्याप्रमाणे नियम पाळले जातात. त्याचप्रमाणे याचे नियम आहेत.
आपल्या इच्छेनुसार महिला हे व्रत करू शकतात. आषाढ महिन्यात अधिक आला तरच हे कोकिळा व्रत येते. घरातील सुख-शांती, धनधान्य समृद्धी यासाठी हे व्रत केले जाते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply