परंपरागत दिंडी सोहळा
ध्वज वैष्णवांचा चालला
ज्ञाना, तुका, नामा, चोखा
संतजनांचा मेळा दंगला
टाळ, मृदङ्ग, चिपळ्या
दिंडया, पताका नाचती
डोलतो, पंढरीचा राणा
वाळवंटी भक्तिचा सोहळा
द्वैतअद्वैत झाले एकरूप
नाही कुठेही अपपर भाव
मुक्त गळाभेट हरि हराची
लोचनी ओघळतो सावळा
ब्रह्मांडाचे ब्रह्मरूप अवघे
राऊळ गाभारी, कृपावंत
कर कटिवर,उभा विटेवर
जगन्नाथ, हरि विठुसावळा
भाळी अबीर, गंध चंदनी
तुळशीमाळा रुळती कंठी
पितांबरी पिवळ्या मेखला
विश्वरूपी विश्वेश्वर सावळा
आषाढी, तिथी देव शयनी
कार्तिकी, देवोत्थान शयनी
आळवुया कीर्तनी, अभंगी
पुंडलिकवरदाss हरिविठ्ठला
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १५७
८ – ७ – २०२२
Leave a Reply