नवीन लेखन...

आता १०० रुपयांचे नाणे

रिझर्व्ह बँकेने २०००, ५००, २०० आणि ५० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता लवकरच १०० रुपयांचं नाणं चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

१०० आणि ५ रुपयांची नवी नाणी लवकरच चलनात आणली जातील, असे रिझर्व्ह बँकेने एका पत्रकात नमूद केले आहे. सध्या १, २, ५ आणि १० रुपयांची नाणी चलनात असून १०० रुपयाचं नाणं सध्याच्या चलनातील सर्वात मोठं नाणं ठरणार आहे.

अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील एकेकाळचे सुपरस्टार डॉ. एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. १९७७ पासून ते १९८७ पर्यंत एम. जी. रामचंद्रन यांनी तीनवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भुषविले होते. एआयएडीएमके पक्षाची स्थापना त्यांनीच केली होती. रामचंद्रन यांनीच जयललिता यांना राजकारणात आणलं होतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..