दिसे किनारा, निवता वारा
तेवती संध्यादीप काही
आता, आस उरली नाही ॥
पूर्वायुष्य या पुसत्या रेषा
नव्या धुक्यात अशा विराव्या
ना भविष्य, नसे वर्तमान, उगा दुःख काही
आता आस उरली नाही ॥ १ ॥
न जगताच जे जगले
जीवन, त्यातच मन उबले
थरथर मनीची शरीरी उतरुन राही
आता आस उरली नाही ॥ ३ ॥
भयाणतेच्या सीमेवरी
वास्तवता वास्तव्य करी
जीवन झाले चोथा, रस उरला नाही
आता आस उरली नाही.
— यतीन सामंत
Leave a Reply