नवीन लेखन...

आता कशाला उद्याची बात?

सतत भविष्याच्या काळजीमुळे आपण आपल्या आसपासच्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत,आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना वेळ कमी देत आहोत,जीवनाचे अमुल्य क्षण वाया घालवत आहोत आणि या सगळ्याची जाणीव आपल्याला त्या गोष्टी हातामधून गेल्यावर होते,हे आपले दुर्भाग्यच.उद्याचा अति विचार करून आपण आपल्या आजच्या सुखांवर विरजण तर नाही टाकत आहोत ना…..??

जीवन जगणे म्हणजे जे चालू आहे ते जगणे ,त्याच्यामधे जगणे पण आपले अति विचार आणि नकारात्मक विचार आपल्या जीवन जगण्यात अडथळे आणत आहेत,नाही का?

अति विचार म्हणजे काय तर,उद्या निकाल चांगला लागेल का?,चांगला नाही लागला तर ? वगैरे. आता हे उद्याचे विचार आता करायची गरज आहे का,जर अभ्यास केला आहे तर निकाल चांगलाच लागणार.नाही केला तर चांगला नाही लागणार.आपण केलेली तयारी आपल्याला नेहमी माहीत असते त्यामुळे परीक्षा झाल्यावर त्याचा निकाल पण आपण अंदाजाने सांगू शकतो कारण अभ्यास केला आहे तर शुन्य गुण नाही मिळणर आणि पेपर कोरा ठेवून पैकीच्या पैकी गुण पण कधी नाही मिळणार. म्हणुन आता निकलाचा विचार करून काही फायदा नाही त्यापेक्षा आताच्या परीक्षेचा अभ्यास करा त्याने तुम्ही प्रगती कराल.

नकारात्मक विचार म्हणजे मी हे नाही करू शकणार,मला हे नाही जमणार असे प्रत्येक गोष्टीत स्वतःला कमी लेखणे आणि निराशावादी राहणे.अशा विचारांनी तर जीवन जगणे व्यर्थ आहे.यामुळे तुम्ही आता काय कधीच जगू नाही शकणार.माहिती आहे की कोणताही माणूस हा काही जन्मापासून नकारात्मक नसतो,त्याच्यासोबत घडलेल्या किंवा घडत असलेल्या घटना त्याला तशा बनवतात.पण त्या माणसाने त्या घटना एक अडचण किंवा समस्या म्हणून न बघता एका संधीच्या किंवा संकेताच्या रुपाने पहिल्या तर…..तर त्या संकटांचा सामना करणे सोपे होईल.आशावादी व्हा,स्वतःवर विश्वास ठेवा ,मी गेल्यावेळी सांगितल्याप्रमाणे नेहमी लक्षात ठेवा तुमच्यात एक जादू आहे काहीही करून दाखवायची.

विचारांवर नियंत्रण असणे खुप महत्वाचे आहे.तुम्हाला जी गोष्ट हवी आहे किंवा तुमचे जे काही स्वप्न आहे तिथेच फक्त तुमचे लक्ष केंद्रित असायला हवे, त्याच वेळी ज्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला काही उपयोग नाहीये त्या गोष्टीचा विचार करायला तुम्ही नकार द्यायला हवा कारण त्याचा उगाच विचार करून आपण आपल्या आजमधला सुंदर क्षण वाया घालवतो आहे.

सकारात्मक विचाराने वर्तमानात जगा.आपला शेवटचा क्षण कोणता असेल आपण सांगू शकत नाही म्हणून आताचा प्रत्येक क्षण शेवटचा आहे असे समजून आजच्या अनमोल क्षणांचा आस्वाद घ्या.

Avatar
About अपूर्वा जोशी 6 Articles
मी अपूर्वा जोशी. मला मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठी साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवे हे माझे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..