एक आठवण
जन्मभराची सोबत
गडद सावली
नित्य श्वासा सोबत
सरतो काळ जरी
स्मरण सारे अंतरात
उलघाल जिव्हारी
छळतो दग्ध एकांत
सत्य जीवाजीवांचे
साऱ्याच चराचरात
गूढ हेच जन्माचे
जाणतो तो भगवंत
जगणेच अनिवार्य
मूक सहावे सावरीत
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १२७
३० – ९ – २०२१.
Leave a Reply