आठवतो का काळ ही भावनो?
काय काळ होता राव तो पहाटे पासून गाणी लावायला सुरवात होयची ती रात्री पर्यंत गाणी असायची ,
त्यात नवल वाटायचं ती म्हणजे कलर बगुण कवर बगुण कॅसेट घ्याची आणि ती जपून ठेवायची ,
प्रल्हाद शिंदे यांची गवळणी , दादा कोंडके यांची गाणी , आनंद शिंदे यांची गाणी फिक्स असायची
हिंदी मध्ये अल्ताफ राजा लय फेमस झाला होता नंतर बेवफा सनम ची गाणी, सोनु निगम ची गाणी जबरदस्त असायची ,,,
कॅसेट अडकल्यावर जो आवाज येत असायचं तो एक हसण्यासारखा असायचं , पुन्हा मग हाताची करंगूळी ने कॅसेट गुंडाळा करायचो , जर का कॅसेट खराब झाले तर मग काय त्याथुन रील बाहेर काढायचो बाहेर असलेल्या लाईटच्या वाइर वर फेकायचो
जाम मज्जा येत असायची ,
ट्रॅक्टर ड्रॉव्हर ने तर कहर करायची राव आणि कपडे शिवणारी ट्रेलर ह्यांच्याकडे इरसाल गाण्याची कॅसेट असायची ,,
ते दिवस ती आठवण ते कॅसेट तो टेप…
आणि त्याकाळी गाणी आयकुन जुळलेले प्रेम
कधीच विसरता येणार नाही….
— राहुल शेंडगे
9588447386
श्रीपुर
Leave a Reply