नयन मनोहर, संध्येसम गं
केशरी, रंगगंधले रूप तुझे
भुरभुरणाऱ्या गं केसासंगे
धुंदपवन, गं खेळीत असे ।।१।।
तव भाळी गं, अर्ध चंद्रमा
नेत्री विलसते शीत चांदणे
लपलीस गं, तूं अशी कुठे ?
बघ गगन धरेवरी येत असे ।।२।।
डोंगरदरी अन, तरु तरुतुनी
न्याहळतो, तुज अधीर शशी
कां ? मिटसी अधर पाकळया
शब्दभावनां! मूक मुग्ध असे ।।३।।
गुलमुसलेली गं सांज बावरी
अस्ताचली जाई भान हरपुनी
नभी मनास द्यावे मुक्त झोकुनी
सावरणारा, तोच श्रीरंग असे ।।४।।
हवे कशाला गं हुरहुर आता
धुंद बरसते गं लाघवी प्रीती
क्षणक्षणांना गं कवेत घेवूनी
आत्मानंद! गं ओसंडीत असे ।।५।।
©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ११०.
१९ – ८ -२०२१.
Leave a Reply