हल्ली का कोणास जाणे
सभोवताली पडत असतो
पाऊस बातम्यांचा
फक्त आत्महत्येच्या…
त्या बातम्यांचा तर होत
नाही ना परिणाम
रिकाम्या मेंदूवर
त्रासलेल्या माणसांच्या…
समस्या, दुःख, विरह
आणि वेदना कधी नव्हत्या
त्या तर सोबतीच होत्या
युगानुयुगे मानवाच्या…
नात्यातील गुंता भ्रम असतो
आणि प्रेम असते माया
आयुष्यात काहीच नसते
वजनाचे आपल्या जिवाच्या…
© कवी – निलेश बामणे ( ND.)
दिनांक – २ ऑक्टोबर २०२१
Leave a Reply