जीवनात अचानक कधी
असा क्षण येतो ।
सारे स्तब्ध नीरव शांत होते ।
ब्रम्हांड गोठल्याचा भास होतो ।
साऱ्याच संवेदना संपुष्टात येतात ।
उरतात फक्त निर्विकार स्पंदने ।
हा जन्म अन मृत्यु मधील
अंतीम थांबा असतो ।
हाच शून्यावस्थेतील अचेतन
अखेरचा जीवन सूर्यास्त ।
जो शाश्वत मृत्यु, अंत!
जीवनातील अंतीम अटळ कटुसत्य ।
जन्मताच मृत्युचही वरदान
भगवंताच दान असतं ।
प्रत्येक जीवाला लाभलेलं असतं ।
सर्वानाच स्विकारावच लागतं ।
यालाच जीवन असं म्हणतात!
म्हणून प्रत्येकानं सतर्कतेंन
विवेके आत्ममुख व्हावं ।
सातत्यानं सत्कर्म करत रहावं!
सहृदयतेने निर्मळ निर्व्याज
निर्मोही प्रेम करीत मने जपावीत!
त्यामुळे आत्मानंद होतो!
त्या अनामिकचे स्मरण ठेवावे!
ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे!
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र.११८
१७ – ४ – २०२२
Leave a Reply