निष्पाप फुलांचा ताटवा सुंदर
गंधाळ, सुगंधी त्याचा मनोहर…
अवीट, स्पर्श लाघवी कोमल
मनोमनी जागविती भाव सुंदर…
जगी जगावे निर्मळ फुलांसारखे
काटयासवे फुलत रहावे निरंतर…
क्षणाक्षणांना नित्य वेचित रहावे
भावनांनी उजळीत जावे मनांतर…
अर्थ जीवनाचा उलगडित जावा
मनामना,सुखवित रहावे निरंतर…
मोहपाश, हे आसक्तीचे मृगजळ
त्यातूनी, जीवा सावरावे निरंतर…
युगायुगातुनी लाभे जन्म मानवी
सत्य, विवेकी आत्मसाक्षात्कार
सांध्यपर्वी मन हळवेहळवे कातर
स्मरावा, एकची तो कृपाळू ईश्वर…
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २३६
१६ /९ /२०२२
Leave a Reply