आत्माराम हा पांडुरंग माझा
अंतरीचा हाच विश्राम माझा।।धृ।।
सदानसदा चालतो सांगाती
सदासर्वदा देई मज सन्मती
जागवितो, जगदिशा अंतरी
कृपाळू हा आत्माराम माझा।।१।।
जगत , व्यवहारी तो रमतो
सत्कर्माची चाल चालवीतो
निष्काम! सत्यरुप दावितो
निर्विकार , आत्माराम माझा।।२।।
जन्मूनीही , मरणच जीवाला
व्यालेले , हेची सत्य सृष्टीला
स्मृतीगंध तो सात्विक गंधावा
सांगतो आत्माराम हा माझा।।३।।
सत्यात वाहते , निर्मल शांती
असत्यात, असे अंती अशांती
जन्मात लाभावी आत्मशांती
भजण्यास आत्माराम माझा।।४।।
वैखरीवरी विठ्ठल! विठ्ठल!!
आत्मरंगी , रमतो आत्माराम
उघडता कवाडे मोक्षमुक्तीची
नेत्री नांदतो आत्माराम माझा।।५।।
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १६१
२५ – १२ – २०२१.
Leave a Reply