नवीन लेखन...

आऊ यांग्लिनची अग्नी परीक्षा !

Aau Yanglin

दैनिक प्रत्यक्षच्या विश्वगंगेच्या तीरावरील सदरात ‘आऊ यांग्लिन’च्या जीवन संघर्षाचा सिद्धार्थ नाईक यांनी उलगडून दाखविलेला क्लेशदायक पण जिद्दी जीवनपट वाचण्यात आला. असे खडतर जीवन अश्या कोळ्या वयात कोणावरही येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

एवढया छोटया मुलामध्ये एवढी समज, एवढे धारिष्ट फक्त तोच एक देऊ शकतो. कारण वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्या वडिलांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून झालेला अपघात, त्यात त्यांना आलेले कायमचे अपंगत्व त्यामुळे सुटलेली नोकरी आणि बहुतेक या सर्वाला कंटाळून आऊच्या आईचे घरातून जाणे हे कुठेतरी खटकते. कदाचित आऊच्या वडिलांना एखादे व्यसन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राहत असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून कोसळणे हा त्याचाच भाग असू शकतो हे नाकारताही येत नाही. घरात यावरून नवरा-बायकोत भांडणेही होत असतील पण तरीही एकाएकी पत्नी आपल्या पतीला आणि पोटच्या गोळ्याला अश्या परिस्थिती टाकून घर सोडून जाणे मातृत्वाला शोभा देत नाही. कदाचित या उलट होण्याची शक्यताच जास्त असते. नवऱ्याला आयुष्यभराचे अपंगत्व आल्याने कदाचित भविष्याची चिंता असह्य झाल्याने तिने घर सोडले असावे. तरीही प्रश्न कायम उरतात.

असो, पण या सगळ्यावर मात करत आऊने वयाच्या पाच वर्षाचा असल्यापासून वडिलांची जी काही सेवा केली आहे त्याला माझा सलाम किंबहुना समाजाच्या सर्वच थरातून तो कौतुकासच नाही तर गौरवला जाऊन बक्षिसास पात्र आहे.

ज्यावयात आऊच्या वयाची मुलं आई/वडिलांकडे हट्ट करतात, लाड पुरवून घेतात, ज्यांच्या हातात मोबाईल असतो, वर खर्चाला खिश्यात पैसे असतात, शाळेत कडक इस्त्रीचे कपडे घालून वडिलांच्या मोटारीतून जातात, घरात आई त्याच्यासाठी आवडीचे गोडधोड पदार्थ करीत असते पण आऊचे जीवन या सगळ्या पलीकडले आहे. हे तो सगळे कसे करत असेल? कोणाकडे शिकला असेल? कोण त्याला मदत करत असेल? असे प्रश्न समोर उभे ठाकतात. ज्याचा तारणहार देव असेल त्याला काय आणि काश्याची कमतरता असेल?

वयाच्या पाचव्या वर्षी सकाळी सहा वाजता उठून शाळेत मधल्यासूट्टीत खाण्याचा डबा तयार करण्यापासून वडिलांना न्याहारी देऊन मग शाळेत जाणं. मध्यला सुट्टीत घरी येऊन वडिलांना भरवणं आणि पुन्हा शाळेत जाणं. शाळेतून आल्यावर गृहपाठ, जेवण बनवून वडिलांना भरवणं आणि मग झोपणं हे त्याचे नित्याचे झाले होते. हे एखादया प्रगल्भ मातृत्वाचे लक्षण समजावे का?

आउने आपल्या घराची आर्थिक बाजूही सांभाळी आणि त्यासाठी त्यानी केलेल्या परिश्रमाची दाद कुठल्या शब्दात वर्णन करावी यासाठी शब्द आणि विशेषणंही कमी पडतील. ह्या सगळ्यावर कडी म्हणजे जेंव्हा त्याच्या वडिलांची तब्बेत बिघडते आणि त्यांना मॉलिश करण्यासाठी लागणारे तेल विकत घेण्यासाठी तो ज्या जिद्दीने आणि महिनतीने कष्ट करतो ते त्या वयातील त्याचे आत्यंतिक धारिष्ट, चिकाटी, वडिलांवरील प्रेम, माया आणि आईच्या ऋदयालाही पीळ पडेल असे त्याचे समंजस वागणे सर्वकाही सांगून जाते. हे बघितल्यावर लोकांनी देऊ केलेली आर्थिक मदत नाकारतांना दाखवलेले मोठेपण आणि लहान वयात आलेले वडिलकीचे भान काय म्हणावे या मुलाला? अश्या मदतीपेक्षा तो नोकरी किंवा कामधंदा करण्याचे वय नसतांना नोकरी/काम मागतो आणि स्वकमाईतून जगण्याचा आणि परिस्थितीशी संघर्ष करण्याचा स्वभाव पुन्हा एकदा सगळ्यांना त्याच्या बद्दलचा आदर आणि प्रेम वाढण्यात होतो. याला म्हणतात परिस्थितीमुळे लहान वयात आलेली प्रौढता, परिपक्वता, शहापण आणि समज. आऊ संकटांना शरण गेला नाही तर त्यांच्याशी झुंजला, लढला. आऊच्या वडिलांना त्याचा अपरंपार अभिमान वाटतो. जगण्याची उमेद हरल्या नंतरही लेकाकडे पाहून जगण्याची त्यांना उर्जा मिळते हेच त्याचे यामागील यश आहे. आऊला परिस्थितीने शहाणा केलं. आऊला पुन्हा एकदा सलाम…!!

जगदीश पटवर्धन, दादर

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..